क्रांतिवीर राजे उमाजी नाईक
"""""""""""""""""""""""""
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे ते आद्य क्रांतिकारक होते.
मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर लगेच भारतातील ब्रिटिश शासनाला त्यांनी आव्हान दिले.
प्रारंभी आपली छोटी सेना संघटित केली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा ,इतरांना त्यांच्या जाहीर घोषणा पत्राने दिली.
यांचे संपूर्ण नाव उमाजी दादाजी खोमणे होते. त्यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथे दिनांक सात सप्टेंबर सतराशे 91 मध्ये झाला आणि पुढे त्यांचे निधन3फेब्रुवारी, 1834. ही पुण्यात झाले. लक्ष्मीबाई नाईक खोमणे आणि दादाजी नाईक खोमणे या मातापित्यांनी त्यांचा सांभाळ केला.
इंग्रजांना भारतातून घालून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे उमाजी नाईक होते .त्यांनी सतत सोळा वर्ष इंग्रजांना झुलवत ठेवून त्यांच्या नाकात दम आणला.
त्यांचे बालपण पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले. या किल्ल्याच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे वडिलोपार्जित होती.
उमाजी यांची माता लक्ष्मी म्हणजे झाशीची राणी, शुर मर्दानी ,होती. तलवार चालवणे, भाला फेकणे दांडपट्टा चालवणे यातील सगळे डावपेच तिने उमजीला शिकविले आणि उमाजीच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम रुजविला.
त्यातूनच त्याच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली .लहानपणी त्याने बेरड रामोशी समाजाची हेरगिरी कला आत्मसात केली होती.
ब्रिटिशांचे हळूहळू पुण्यात वर्चस्व वाढत होते. ब्रिटिश सैन्यबळावर मराठी मुलुख आपल्या ताब्यात घेत होते. कालांतराने सन अठराशे तीन मध्ये दुसऱ्या बाजीरावावर या ब्रिटिश इंग्रजांनी बंधने आणली .परंपरेने चालत आलेली पुरंदर किल्ल्याची जबाबदारी रामोशी उमाजी घराण्याकडून काढून घेतली.
आपल्यात्तील माणसांना ते काम दिले. यात वशिलेबाजी झाली आणि रामोशी घराण्यावर अन्याय झाला त्यांना उपाशी राहण्याची वेळ आली असे हे इंग्रजांचे अत्याचार वाढताना उमाजीने उघड्या डोळ्यांनी पाहिले, उमाजी नाईकाचा आदर्श शिवाजी महाराज होते त्यांनी क्रांतिकारक विचारांच्या आपल्या समाजाला गोळा केले जेजुरीच्या खंडोबाला भंडारा उधळून इंग्रजांच्या विरोधात लढण्याची शपथ घेतली विद्रोहाची घोषणा केली .इंग्रजी सत्तेविरुद्ध मशाल पेटवली .वतनदार यांना लुटून लुबाडून उमाजी नाईक याने चक गोरगरिबांना ती लूट वाटून दिली.
इसवीसन अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडक वला .
उमाजी नाईकांनी आपलं सैन्य एकत्र करून इंग्रजांच्या विरुद्ध उठावाची तयारी केली.
इंग्रजांनी उमाजीच्या कारवाया लक्षात घेऊन त्याला एक वर्ष जेलमध्ये डांबले. जेलमधून सुटल्यावर त्याचा इंग्रज विरोध अधिक वाढला बळावला त्याला जनतेची उत्स्फूर्त साथ मिळाली इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवडच्या पुरंदरच्या मामलेदार यामार्फत उमाजीला अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला घनघोर इंग्रज मराठा युद्ध झाले .उमाजीने5 इंग्रज सैनिकांची पाच मुंडके कापून त्या मामलेदाराकडे पाठवली .त्यामुळे इंग्रज च. उमाजीची दहशत निर्माण झाली. उमाजी जवळही पाच हजार सैन्य जमा होते ते दऱ्याखोऱ्यात राहत होते. असाच सन 1824 मध्ये उमाजीने बाबू ट्री चा खजिना लुटून मंदिराच्या व्यवस्थेसाठी वाटून दिला .30 नोव्हेंबर 1827 मध्ये इंग्रजांना उमाजीने दम भरला.
यापुढे सातपुडा ते सह्याद्री असे हजारो विद्रोहही होत राहतील आणि एक दिवस भारतातून पळता भुई थोडी होऊन तुम्हा ब्रिटिशांना जावेच लागेल.
21 डिसेंबर 830 ला असेच बाई ड, इंग्रज अधिकार्याला आणि त्याच्या सैनिकांना मांढरदेवी किल्ल्यावरून उमाजीने पळवून लावले होते.
16 फेब्रुवारी 1931 ला इंग्रजांना सहकार्य करू नये .उलट त्यांचा खजिना लुटावा.शेत सांरा देऊ नका.सागितले. त्यामुळे इंग्रजांचे धाबे दणाणले त्यांनी दहा हजार रुपये रक्कम आणि 400 बिघा जमीन असे इनाम उमाजीला पकडण्यासाठी ठेवले त्याप्रमाणे उमाजीच्या सैनिकांना फितूर करण्यात त्यांना यश आले.
दुर्दैवाने कालोजी आणि नाना चव्हाण यांनी उमाजी ची खबरबात इंग्रजांना पुरवली. ठावठिकाणा सांगितला ,
शेवटी 15 डिसेंबर 1831 ला भोर तालुक्यातील ,,उतरवली गावी उमाजी नाईकांना पकडून दिले. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला. न्यायाधीश जेम्स टेलर याने त्याला फाशीची शिक्षा दिली .
3 फेब्रुवारी1832 ला पुण्याच्या खर कमल आळीच्या मामलेदार कचेरीत उमाजीला फाशी दिले, त्याचे प्रेत इतरांची हिंमत होऊ नये म्हणून झाडाला लावून ठेवले होते, याचे कारण केवळ दहशत निर्मिती .
मोकिन टॉसनी म्हटले आहे
"उमाजी चा आदर्श शिवाजी महाराज होते. जर त्याला फाशी दिले नसते तर दुसरा शिवाजी निर्माण झाला असता," हे सत्य आहे.