•  06 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

तब्बल १५० वर्षांनी पुन्हा एकदा साजरा झाला 'सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ'

अंजली तागडे (Anjali Tagade) 15 days ago
संस्कृती  

इतिहास प्रेमी मंडळाचा पुढाकार ; नवा विष्णू मंदिरात सन १८७३ रोजी साजरा झाला होता सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम
 
पुणे : चैत्र वद्य त्रयोदशी म्हणजेच दिनांक २५ एप्रिल १८७३ रोजी सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात झालेल्या पाच हजार महिलांच्या हळदी-कुंकू समारंभाच्या आठवणींना उजाळा देत तब्बल १५० वर्षांनी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्या तिथीच्या दिवशी सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ पार पडला. पुणे सार्वजनिक सभेचे नेते गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' यांनी 'स्त्री विचारवती सभा' यांच्या पुढाकाराने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती करीत कार्यक्रमाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
 
इतिहास प्रेमी मंडळ व पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम शतकोत्तर सुवर्णमहोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शरद पंडित, सुप्रसाद पुराणिक आदी उपस्थित होते. 

शेफाली वैद्य म्हणाल्या, हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांमध्ये संवाद होतो. महिला एकत्र येणे हे महत्वाचे आहे. हळदी-कुंकू समारंभाची परंपरा केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतभर आहे. सामाजिक उद्देशाने एखादी परंपरा पुढे नेणे, हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. तो पण जपायला हवा.

विद्याधर नारगोळकर म्हणाले, सार्वजनिक काकांनी स्वदेशी शपथ, इंग्रजी भाषेतील मासिक, दुष्काळात गरजूंना आर्थिक मदत अशी वैविध्यपूर्ण सामाजिक कामे केली. त्यात १५० वर्षांपूर्वी आयोजित केलेले सार्वजनिक हळदी-कुंकू हा वेगळा कार्यक्रम होता. नवा विष्णू मंदिर त्या घटनेचे साक्षीदार आहे.

मोहन शेटे म्हणाले, तब्बल १५० वर्षांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाची बातमी मुंबई च्या नेटिव्ह ओपिनियन मध्ये छापून आली होती. ही घटना  त्या काळातील एक क्रांतिकारी व महाराष्ट्राला प्रागतिक घडवणारी घटना ठरली. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेला उजाळा  देण्यासाठी पुन्हा एकदा त्याच नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता कामगार, भटके विमुक्त, देवदासी, तृतीयपंथी अशा समाजातील उपेक्षित महिलांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी महिलांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश घाटपांडे यांनी आभार मानले.

* फोटो ओळ :  इतिहास प्रेमी मंडळ व पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम शतकोत्तर सुवर्णमहोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र वद्य त्रयोदशीला सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात झालेल्या पाच हजार महिलांच्या हळदी-कुंकू समारंभाच्या आठवणींना उजाळा देत तब्बल १५० वर्षांनी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ पार पडला.


- अंजली तागडे (Anjali Tagade)

  • Sarvajanik Haldi Kumku
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

अंजली तागडे (Anjali Tagade)

संपादक, विश्व संवाद केंद्र पुणे

 संस्कृती (8), जनजाती (3), महिला (5), पर्यावरण (4), उद्योग (2), सामाजिक (31), साहित्य (2), हिंदुत्व (2), रा. स्व. संघ आणि परिवार (5), इतिहास (8), मनोरंजन (2), राजकारण (1), कला (3), सेवा (4), शिक्षण (2), विज्ञान (2), कृषी (1), क्रीडा (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.