बुडापेस्ट, दिनांक २३ जून २०२५ - हंगेरीतल बुडापेस्ट शहरात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय दूतावासाच्या अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्र येथे शुक्रवारी (दिनांक २१ जून) डॉ. कोल्टाई जेनो स्पोर्टस्कोन्ट, हंगेरियन युनिव्हर्सिटी ऑफ स्पोर्ट्स सायन्स येथे हा कार्यक्रम पार पडला.

योग दिनाचा कार्यक्रम हंगेरीमधील सर्वात मोठ्या सार्वजनिक मेळाव्यांपैकी एक होता. यात योगप्रेमी, भारताचे मित्र, भारतीय समुदायाचे सदस्य, परराष्ट्र व्यवहार क्षेत्रातील अधिकारी आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा उत्साही सहभाग दिसून आला. या सोहळ्याने योगाचे एकता, शांती आणि सर्वांगीण कल्याणाचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्व सुंदररित्या अधोरेखित केले. भारतीय दूतावासाचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती दिली.
मध्य युरोपमधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित क्रीडा विद्यापीठांपैकी एक असलेल्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात योग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हे सत्र इंग्रजी आणि हंगेरियन अशा दोन्ही भाषांमध्ये घेण्यात आले. प्रथमच योगा करणारे ते अनुभवी योग साधकांपर्यंत सर्वांना त्यात सहभागी होता आले. संयुक्त राष्ट्र महासभेने २०१४ मध्ये घोषित केलेला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी जगभरात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. बुडापेस्टमधील या वर्षीचा सोहळा, मुख्य कार्यक्रमाच्या आधी अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्राने हंगेरीमध्ये आयोजित केलेल्या सुमारे ३० योग कार्यक्रमांची परिणती होती.

या कार्यक्रमाचा समारोप अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. मुकेश कुमार श्रीवास्तव यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यांनी सर्व मान्यवर, भागीदार, योग शिक्षक, स्वयंसेवक, सहभागी, समर्थक आणि प्रसारमाध्यमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. श्रीवास्तव यांनी योगाची चिरंतन मूल्ये वाढवण्यासाठी हंगेरी सरकारच्या सततच्या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्र, भारतीय दूतावासाने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाने जागतिक सलोखा आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यात योगाची चिरस्थायी आणि एकत्रित शक्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.