
माऊली नीरा स्नान
माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात लोणंद येथे प्रवेश
आज पहिले उभे रिंगण
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याने दुपारी ३ वाजता प्रवेश केला. नीरा स्नानानंतर वैभवी लवाजम्यासह आलेल्या या सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांनी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
उद्या (शुक्रवार) सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.
श्री हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे होते. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या दरबारात ते सरदार होते. श्री ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी सन १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरु केला. आज त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक असुन त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो.