•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा

विश्व संवाद केंद्र - पुणे 21 days ago
बातम्या  

जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा - नितीन गडकरी

दि. २९ जून, नागपूर ः जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा. “जो करेगा जात की बात, उसे देदो लाथ” असा ठाम विचार केंद्रीयरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला. “शोषित, पीडित, वंचित, दलित, दिव्यांग यांना सक्षम करण्यासाठी केवळ सरकारच नाही, तर प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने आपले कर्तव्य बजावले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित “सामाजिक न्याय परिषद २०२५” कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

 
या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १२०० नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. सामाजिक न्याय विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील दहा मान्यवरांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यक्ती कर्तृत्वाने मोठी व्हावी, असे समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
 
गडकरी म्हणाले की, बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले, त्याचा अर्थ समजून आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या दिशेने वळवायला हवे. त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले आणि समाजाने त्यातून शिकले पाहिजे. सेवा, शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात समाजातील प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
 
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित समाज आपण घडवूया. विवेक विचार मंचाने समाजातील प्रश्न, समस्या आणि सूचना पटावर घेऊन शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यांचे निरसन करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसंगी सांगितले की, “आपल्या देशासाठी सर्वोच्च ग्रंथ म्हणजे संविधानच आहे. देशाचे पंतप्रधान २०४७ चा विकसित भारत साकार करण्यासाठी संविधानाला सर्वोच्च स्थान देत कार्यरत आहेत. नागपूरातील दीक्षाभूमी ही सामाजिक समस्यांना दिशा देणारी पवित्र भूमी आहे आणि महाराष्ट्राला सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टिकोनातून देशात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.

 

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे बाबासाहेबांचे महान विचार लक्षात ठेवून संघटित समाजच सामाजिक न्याय प्रस्थापित करू शकतो,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. परिषेदेचे अध्यक्षपद जेष्ठ लेखक, विचारवंत पद्मश्री नामदेव कांबळे यांनी भूषविले. परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे महासंचालक सुनील वारे, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सुभाष कोंडावार, स्वागत समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, संदीप जाधव, विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धायारकर यांनी केले. आभार प्रदर्शन मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी केले.
जाती निहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत, महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायद्याचे समर्थन व बोधगया महाविहार विषयात सर्व समाजाने सौहार्दपूर्ण भूमिका घ्यावी असे तीन ठराव परिषदेत पारित केले गेले.
सामाजिक न्याय परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुनील कीटकरू, राजू साळवे, मनीष मेश्राम, आप्पासाहेब पारधे, नितीन केदार, सागर जाधव, दत्ता शिर्के, अनंत जगनीस व अतुल शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले,

 

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • जातपात
  • अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.