•  18 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी जीवन समर्पित करणारे इतिहासकार गजानन मेहेंदळे

विश्व संवाद केंद्र - पुणे today
भाष्य  

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी जीवन समर्पित करणारे इतिहासकार गजानन मेहेंदळे

पुणे, १८ सप्टेंबर २०२५ ः आजच्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये राजकारणाचे प्राबल्य असलेल्या काळात. खरा इतिहास हा जुळवूण सांगण्याची पद्धत निर्माण झालाी आहे. ती अतिशय दुर्दैवी आहे. इतिहासकार हा फक्त इतिहास लेखन करतो. जे वास्तव सत्य आहे. जे राष्ट्राला पोषक आहे. असे सत्यलेखन तो इतिहासकार करत असतो. अशा इतिहासकारांची काळाला खूप गरज आहे. शिवछत्रपती आणि शंभूराजांबद्दल इंग्रजांच्या काळात वाईट लेखन केले गेले. इंग्रजाळलेली मनोवृत्ती देखिल त्याच मार्गाने गेली. असे इतिहासात नोंद करता येते. त्यादृष्टीने आज जे काही संशोधन करणे आवश्यक आहे.ते करून खरा इतिहास लोकांसमोर आला आहे. आतपर्यंत लिहिलेला इतिहास हा परकीयांनी लिहिला आहे. आपला भारतीय दृष्टीकोनातून इतिहास लेखन केले पाहिजे. तेचे आदर्श गजाननराव मेहंदळे होते.    

श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर, १९४७ रोजी झाला. गजाभाऊंना शालेय जीवनापासूनच इतिहासाची खूप आवड होती. गजाभाऊंनी १९६९ साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यातूनच पुढे त्यांना युद्धशास्त्राची अधिक आवड निर्माण झाली आणि अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचे वाचन आणि अभ्यास सुरू केला.
 
- युद्ध पत्रकार
वयाच्या २४व्या वर्षी तरुण भारतचे पत्रकार म्हणून त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले. युद्ध सुरू होण्याच्या सात-आठ महिने आधीच गजाभाऊ तिथे पोहोचले. त्या वेळी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले नसले, तरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती कारण बांगलादेश मुक्ती वाहिनीने क्रांतीकार्याला सुरुवात केली होती.
 
अशावेळी गजाभाऊंनी बांगलादेशच्या वेगवेगळ्या सीमांमधून आत प्रवेश केला. तिथली सगळी परिस्थिती अनुभवली. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बांगलादेश मध्ये असलेला रोष त्यांनी अनुभवला. त्यावर लिहिलेले लेख गजाभाऊ तार करून तरुण भारतला पाठवित असत. यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तेव्हादेखील गजाभाऊ बांगलादेशातच होते. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या एका गटाबरोबर  गजाभाऊ युद्धक्षेत्रात काही काळ वावरले. तिथे तळ ठोकून असलेल्या अनेक भारतीय लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांच्या मुलाखती झाल्या.
 
- शिवचरित्र अभ्यासाला प्रारंभ
युद्ध संपल्यावर गजाभाऊ दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी बांगलादेश युद्धावर एक पुस्तक देखील लिहिले. परंतु ते अप्रकाशित आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांवर लष्करी दृष्टीकोनातून किंवा त्यांच्या युद्धनेतृत्वाबद्दल पुस्तक लिहावे असा विचार त्यांच्या मनात आला.  
 
गजाभाऊंनी संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर (M.A.) पदवी घेतली. यावेळी युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राकडे वळले. त्यातून निर्णय झाला शिवाजी महाराजांच्या चरित्राचा पूर्ण अभ्यास करायचा. यासाठी मग मोडीलिपी बरोबरच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा शिकले. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश भाषेतील इतिहासाची साधने होतीच. ज्याला या भाषा येतात तोच खोलात जाऊन शिवचरित्राचा अभ्यास करू शकतो. यासाठी मूळ साधने आणि मुघलांची साधने अभ्यासणे आवश्यक होते. या अभ्यासासाठी ते भारतभर फिरले. जिथे जिथे संदर्भ कागदपत्रे होती ती मिळवली. अनेक अभ्यासकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवचरित्र इंग्रजीतून लिहिले. मग मराठीतूनही लेखन केले. त्यामध्ये १६५८ पर्यंतच्या इतिहासावर २५०० पाने झाली आहेत आणि पुढील लेखन चालू आहे.
'Shivaji his Life and Times' हा एक हजार पानांचा इंग्रजी ग्रंथ आणि 'श्री राजा शिवछत्रपती' हा अडीच हजार पानांचा मराठी ग्रंथ हे या संशोधनातून साकार झाले आहेत. यामध्ये जवळजवळ सात हजार संदर्भ दिले आहेत. याबरोबरच 'शिवछत्रपतींचे आरमार', 'आदिलशाही फर्माने' या पुस्तकांचे ते लेखक आहेत. 'Tipu as he really was' ही त्यांची इंग्लिश पुस्तिका यापूर्वीच प्रकाशित झाली आहे. त्यांचा Tipu: As He Really Was हा ग्रंथ देखील प्रकाशित झाला असून औरंगजेबाच्या धार्मिक धोरणावर त्यांचा ग्रंथ येऊ घातलेला होता.


 
भारतात इस्लामिक सत्तेचे पाय पहिल्यांदा रोवल्यापासून पुढे जवळजवळ हजार वर्षे या राजवटींनी येथील प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. या राजवटींनी अवलंबिलेले धार्मिक धोरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे झालेला आमुलाग्र बदल हा आगामी काळात प्रकाशित होणाऱ्या 'भारतातील इस्लामी राजवट आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य' या ग्रंथाचा विषय होता. गजाभाऊंनी एकदा म्हटले होते, "शिवाजी महाराजांना इतिहासातून काढले तर आपला इतिहास कुठे जातो? आणि त्यांचा इतिहासात समावेश केला तर कुठे जातो? हे महत्वाचे आहे. इस्लामी जुलमी राजवटींना शिवाजी महाराजांनी रोखले, हे जर कळले तर शिवचरित्र कळले."
 
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास
गजाभाऊंनी सन २००० ते २०१७ अशी १७ वर्षे पहिले आणि दुसरे महायुद्ध याचा सखोल अभ्यास करून त्यावर सुमारे सहा हजार पानांचे लेखन पूर्ण केले आहे. आगामी काळात त्याचे १० ते १२ खंड प्रसिद्ध होणार होते. त्यातही गुप्त संदेश उलगडणे आणि त्यांचे वाचन करणे या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे.
 
अभ्यासू व्यक्तिमत्व
गजाभाऊ भारत इतिहास संशोधक मंडळाचे ज्येष्ठ सभासद होता. मागील पन्नास वर्षात असा दिवस क्वचितच गेला असेल की, गजाभाऊंनी शिवकालीन कागदपत्रे अभ्यासली नाहीत. अभ्यास कसा करावा, ध्येयासक्त होऊन काम कसे करावे, अभ्यासासाठी विविध भाषा शिकल्याने कशी माहिती मिळविता येते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आजही गजाभाऊ जर्मन भाषा शिकत होते. अतिशय बुद्धिमान आणि दांडगी स्मरणशक्ती असलेल्या गजाभाऊंचा मित्रपरिवारही मोठा आहे. त्यामधील विशेष उल्लेख करावा लागेल पुण्याच्या माजी आणि व्यासंगी खासदार श्री. प्रदीपदादा रावत यांचा.


 
विविध संस्थांचे मार्गदर्शक
भारत इतिहास संशोधक मंडळाबरोबरच भांडारकर संस्था, डेक्कन कॉलेज, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या संस्थांशी गजाभाऊ अनेक वर्षे संलग्न आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर) या संस्थेमध्ये गजाभाऊंना निमंत्रण देऊन सल्लागार सदस्य केले गेले. महाराष्ट्र शासनाने शिवरायांची जन्मतिथी निश्चित करण्यासाठी केलेल्या समितीत ते होते. काही काळ बालभारतीच्या इतिहास पाठ्यपुस्तक मंडळाचे सल्लागार होते.
 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • गजानन मेहंदळे
  • इतिहासकार
  • शिवचरित्र
  • इतिहास
Share With Friends

अभिप्राय

कै. इतिहासाचार्य गजानन मेहेंदळे सर यांची उणीव कधीही भरुन निघणार नाही... मेहेंदळे सरांनी 35 वर्षे अविरतपणे अभ्यास करून शिवछत्रपतींचा इतिहास पुराव्यानिशी पुस्तक रुपाने सर्वांसमोर ठेवला आहे....मेहेंदळे सरांच्या " श्री राजा शिवछत्रपती " या ग्रंथामुळे सामान्य वाचकांना, इतिहास अभ्यासकांना तर लाभ होईलच शिवाय इतिहास संशोधकांना नवी दिशा मिळेल.
प्रमोद सूर्यवंशी 13 Mar 2026 14:49

आदरणीय कै. मेहेंदळे सर आपल्या जाण्याने विशेषतः मराठ्यांचा इतिहास लेखन, संशोधन कार्य करण्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आपणास अनेक वेळा पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये भेटण्याचा आणि ऐकण्याचा योग आलेला होता. सी.टी.बोरा महाविद्यालयात इतिहास विषयाच्या सेमिनार मध्ये आपले अप्रतिम व्याख्यान झाले होते. सर आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
भूषण फडतरे, बीजेएस महाविद्यालय 18 Sep 2025 16:21


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (58), सामाजिक (110), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (44), संस्कृती (40), जनजाती (17), महिला (15), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (28), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (14), सेवा (18), साहित्य (11), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.