पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - अदम्य चैतन्याची महाराणी
आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण हे नेहमीच मार्गदर्शक आणि बोधप्रद असते. हा इतिहास ज्यांनी घडवला अशा थोर विभूतींची चरित्रे दीपस्तंभाप्रमाणे सतत प्रकाशमान आणि दिशादर्शक असतात. समर्पणाची, त्यागाची, धर्मपरायणतेची स्फुल्लिंगे चेतवणाऱ्या या व्यक्तींना अमरत्वाचे वरदान प्राप्त होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र त्यांच्या अंगभूत गुणांनी आणि धर्मपरायण वृत्तीने असेच अमर झाले आहे.
अहिल्यादेवींचे संपूर्ण जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचा पाठ आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक वादळे आली, आपल्या परिवारातील आप्तांचे, सुहृदांचे मृत्यू त्यांना पहावे लागले, स्वतःच्या मुलीचा कायमचा वियोग सहन करावा लागला, पण तरीही त्या आयुष्यभर एका आदर्श राज्यकर्त्याचे आचरण करत प्रजाहिताची कामे करत राहिल्या.
राज्यातील करप्रणाली सौम्य केली. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या, वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. त्यांच्या धर्मपरायण वृत्तीने त्यांनी आसेतुहिमाचल आपली छाप सोडली. काशी विश्वनाथ, घृष्णेश्वर, वैजनाथ, सोमनाथ या पुण्यक्षेत्रांचे पुनर्निर्माण केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे अवघे जीवन हे अशा लोककल्याणकारी कार्यांमध्ये व्यतीत झाले. अहिल्याबाईंनी आपल्या धर्मकार्याला दानशूरतेची, परोपकाराची जोड दिली. त्यांच्या पुढाकाराने श्री मल्लिकार्जुन, श्री वैजनाथ, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर येथे मंदिरे बांधण्यात आली. श्री सोमनाथ आणि श्री ओंकारेश्वर येथे मूर्ती पुन्हा स्थापित करण्यात आल्या. बद्रीनाथ, द्वारका रामेश्वरम आणि जगन्नाथ पुरी येथे भिक्षागृहे आणि धर्मशाळा सुरू झाल्या. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका या सप्तपुरींमध्ये विश्रामगृहे, मंदिरे आणि घाट बांधण्यात आले. याव्यतिरिक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, माळवा आणि राजपुतानामध्ये विविध ठिकाणी अनेक मंदिरे, विहिरी, घाट, विश्रामगृहे आणि कुंड विकसित करण्यात आले.
त्यांच्या जन्म त्रिशताब्दीच्या निमित्ताने अहिल्यादेवींचे हे स्फूर्तिदायक जीवन सर्वांसमोर यावे या उद्देशाने भारतीय विचार साधनेने हे चरित्र प्रकाशित करण्याचे ठरवले. अशा या असामान्य स्त्रीच्या कर्तृत्वाचा वेध प्रस्तुत पुस्तकातून घेतला आहे.
मूळ इंग्रजी लेखिका - चिन्मयी मुळे
मराठी अनुवाद - देविदास देशपांडे
पृष्ठ संख्या - १३७
किंमत: २५०/-
सवलत मूल्य - २०० रू.
संपर्क 8999192654
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी 8999192654 या नंबरवर संपर्क करा