बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनानामित्त व्याख्यानमाला

पुणे, ः महाराष्ट्रभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दिनांक ७ डिसेंबर) माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रविवारी (दिनांक ८ डिसेंबर) लेखक विवेक घळसासी आपले विचार मांडणार आहेत. टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी सात ते साडेआठ यावेळेत ही व्याख्याने होतील.
अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रमाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत अविनाश धर्माधिकारी 'भारत तोडो षडयंत्र' यावर बोलतील. तर रविवारी विवेक घळसासी 'भारताच्या परम वैभवाचा आधार-माझं घर माझा परिवार' या विषयावर बोलतील. कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ अॅड. डी.डी. शहा उपस्थित असणार आहे. कार्यक्रम मोफत प्रवेश असल्याचे आयोजकांनी सांगितले.