सामाजिक समरसता आणि गोसेवेवर सरसंघचालक-आचार्यश्रींमध्ये मंथन

भिलवाडा (राजस्थान), दि. १५ सप्टेंबर २०२६ :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या राजस्थान दौऱ्यादरम्यान सोमवारी (१४ सप्टेंबर) भिलवाडा येथे राष्ट्रसंत मनोज्ञाचार्य श्री पुलक सागर जी महाराज यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही मान्यवरांमध्ये धर्म, संस्कृती, गोसेवा तसेच सामाजिक एकता आणि समरसता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.या सदिच्छा भेटीदरम्यान आचार्यश्रींनी डॉ. मोहन भागवत यांना 'ॐ' ची प्रतिकृती आणि ग्रंथ भेट दिला.
डॉ. भागवत यांनी आचार्यश्रींचे पदप्रक्षालन करून आशीर्वाद घेतले. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसता अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे प्रतिपादन आचार्यश्रींनी या वेळी केले. या प्रसंगी आचार्य पुलक सागर जी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित 'एक और मुक्तिदूत' या पुस्तकाचे विमोचन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. इंदूर येथील लेखिका सरोज शाह यांनी हे पुस्तक लिहिले असून, विमोचनानंतर ते आचार्यश्रींच्या चरणी समर्पित करण्यात आले