•  15 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 30 days ago
बातम्या  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

‘राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य’
पुणे - महिला फक्त 'चूल आणि मूल' एवढ्या पुरतेच मर्यादित नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज २१ शतकातील नारी उभी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आजच्या सक्षम नारीची पायाभरणी केली आहे. तुम्ही अबला नाही, सबला नारी आहात, तुम्ही आपली ताकद ओळखा असा संदेश डॉ. आशुतोष काळे यांनी दिला. 


बिबवेवाडी येथील आय स्कूलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. डॉ काळे पुढे म्हणाले, माहेश्वरी साडीची निर्मिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली असून अहिल्यादेवी होळकरांचे जीवन चरित्र पूर्णपणे एका तपस्विनीसारखे होते. एक शक्तिशाली शासक असूनही, त्यांची प्रतिमा  विनम्र होती. हातात  महादेवाची पिंड आणि बेल पत्र घेऊन त्यांनी शासन चालवले. हिंदू धर्म जोपासण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्याच शासन काळात इस्लामिक आक्रमकांनी ध्वस्त केलेले कशी विश्वेशवराचे मंदिर पुन्हा बांधले. त्या सोबत उत्तरेतील अनेक मंदिरांची बांधणी त्यांनी केली. समाज व राष्ट्र बलशाली होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

त्या उत्तम दूरदृष्टी असलेल्या शासक होत्या, उत्तम प्रशासकीय कौशल्य त्यांच्या कडे होते. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई महाराज यांच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य आहे व त्या धर्म कार्या करता सर्व समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे असा विश्वास डॉ काळे यांनी व्यक्त  केला. 
संचालिका शीतल लडकत,  मंजिरी आळशी यावेळी उपस्थित होत्या.

- डॉ. आशुतोष काळे 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (138), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.