•  29 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा श्रीगणेशा; ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न!

विश्व संवाद केंद्र - पुणे 16 days ago
बातम्या  

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा श्रीगणेशा; ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न!
 

नाशिक, ११ जून २०२६ :
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अधिकृत शुभारंभ आज रामकुंडावर भक्तीमय वातावरणात झाला. श्रीरामाचा जयघोष, शंखनाद आणि वेद मंत्रोच्चाराच्या गूजरात 'सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा' कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने कमला एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासनासोबतच नागरिक आणि साधू-संतांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात मागील वेळेपेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच सुमारे १२ कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. या देश-विदेशातील भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक म्हणून पुढाकार घ्यावा. तसेच, गोदावरी नदीची स्वच्छता केवळ एक दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती सातत्याने राखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या कामांमुळे पुढील वर्षात नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलेल, असे महाजन यांनी नमूद केले.कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री महाजन यांनी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करुन त्‍यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले

या सोहळ्याला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,   यांच्यासह जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आणि दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत याप्रसंगी  भाविक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • कुंभमेळा
  • नाशिक
  • त्र्यंबक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (58), सामाजिक (110), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (44), संस्कृती (40), जनजाती (17), महिला (15), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (28), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (14), सेवा (18), साहित्य (11), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.