पुणेः शनिवार पेठेतील भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेत नुकतेच महा भोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आलो होता. कुटुंब प्रबोधन कसबा भागाच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवश्री देवळणकर यांनी श्लोक घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मोहीनी भोसले उपस्थित होते. कांचन पुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारत माता पूजन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहाली नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या वक्त्या भाग्यश्री हजारे यांनी ओघवत्या वाणीत कुटुंब प्रबोधन, लव्ह जिहाद ,महिला सबलीकरण आणि १०० % मतदान अशी विषय मांडणी केली. नंतर भोंडल्याचे विविध खेळ आणि गीते झाली. मोतीबाग नगर मातृशक्ती आयाम प्रमुख पल्लवी कदम यांनी आभार मानले.