•  07 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

आसाममधील ५ हजार पुरग्रस्त कुटुंबांचे 'किसान संघ' करणार पुनर्वसन

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
बातम्या  

आसाममधील ५ हजार पुरग्रस्त कुटुंबांचे 'किसान संघ' करणार पुनर्वसन
अन्नधान्य, मदत साहित्याबरोबर औषध सेवांचा वेग वाढला

गुवाहाटी , दि. ६ ऑगस्ट २०२६ : 
आसाममधील शिवसागर आणि चराईदेव जिल्ह्यांत भीषण महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 'भारतीय किसान संघ' पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला असून, अन्नधान्य व मदत साहित्यासोबतच ५ हजार बाधित कुटुंबांना पुन्हा स्वावलंबी बनवण्यासाठी पुनर्वसन मोहीम राबवली जात आहे.

या भीषण नैसर्गिक आपत्तीचा ६२२ गावांतील सुमारे ३ लाख ३२ हजार नागरिकांना थेट फटका बसला आहे. यामध्ये चराईदेव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक दणका बसला असून, तेथील १ लाख ४२ हजार नागरिक बाधित झाले आहेत; त्यापाठोपाठ शिवसागर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पुरामुळे सुमारे ४५ हजार ३४२ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून, ३२ हजार ४७७ नागरिकांना घरे सोडून ८१ सरकारी मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. तसेच ७४ हजारांहून अधिक जनावरांचा यात मृत्यू झाला आहे.

अशा बिकट परिस्थितीत किसान संघाच्या लखीमपुर, जोरहाट, डिब्रूगड, धेमाजी, मोरीगाव, नलबारी आणि कामरुप या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. शेती पुन्हा उभी करण्यासाठी ५०० बीघा जमिनीवर लागवड करता येईल, एवढ्या भाताच्या रोपांची (पॅडी सॅपलिंग) सोय करण्यात आली आहे. पूरग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध करून दिले जात आहेत. याशिवाय, किसान संघाशी संलग्न असलेल्या तीन शेतकरी उत्पादक संघटनांनी (एफपीसी) मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन लाख रुपयांचा निधी उभारला आहे.

आरोग्यविषयक आणीबाणी हाताळण्यासाठी जोरहाट जिल्हा शाखेकडून बाधित भागात पारंपरिक औषधी/हर्बल वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केली जात असून, तेथे घरगुती उपचारांचे प्रशिक्षणही दिले जात आहे. मोरीगाव जिल्ह्यातील ५० कार्यकर्त्यांचे पथक गेल्या चार दिवसांपासून शिवसागर येथील पूरग्रस्त भागात तळ ठोकून असून, बाधित कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती, स्वच्छता मोहीम आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करत आहे.

पाणी ओसरल्यानंतर बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांतील शाखांद्वारे बाधित कुटुंबांसाठी मशरूम उत्पादन, कुक्कुटपालन, पशुपालन आणि इतर स्वरोजगार योजना राबवल्या जाणार आहेत. विविध उपक्रमांद्वारे पूरग्रस्तांना पुन्हा पायावर उभे करण्याचे उद्दिष्ट किसान संघाने ठेवले आहे.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • आसाम
  • पुरग्रस्त
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (183), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (87), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.