कोजागिरी जागृत होण्याचा दिवस - हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे
पुणे - दिनांक १६ ऑक्टोबर रोजी आंबेगावच्या सिल्वर काउंटी या सोसायटी मध्ये कोजागिरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या वेळेस श्री अंकुर उमेदकर यांनी " आपली संस्कृती आणि परंपरा" या विषयावर आपले विचार मांडले. श्री अंकुर उमदेकर हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत तसेच समाज कार्यकर्ते आणि व्याख्याते आहेत.
यावेळेस श्री अंकुर म्हणाले कि भारत हे एक अतिशय पुरातन आणि सनातन संस्कृती असलेले राष्ट्र आहे आणि धर्म त्याचा पाया आहे. जे नष्ट होत नाही ते सनातन. इतर कितीतरी संस्कृती नष्ट झाल्या पण कित्येक आक्रमणानंतरही भारतीय संस्कृती टिकून आहे.आपल्या संस्कृतीत आपण परस्रीला मातेसमान मानतो इतकेच नाही तर पृथ्वी , नद्या ,गाय यांनाही आपण माता मानतो. हि संस्कृती सदाचार, सहिष्णुता , सर्वसामावेशकता मानणारी संस्कृती आहे त्यामुळे त्याचे एक प्रेषित नाही , एक ग्रंथ नाही. अश्या या सनातन संस्कृतीवर आज जाणीव पूर्वक आघात होत आहेत. लव्ह जिहाद, Vote जिहाद, असे अनेक प्रयत्न चालू आहेत. शेजारील बांगलादेशसारख्या राष्ट्रातील तसेच पश्चिम बंगाल मधील हिंदूंची परिस्थिती वाईट आहे.आपण सावध आणि संघटित राहिलो नाही तर हि आग आपल्यापर्यंत नक्कीच पोहचू शकते. त्यामुळे संघटन पाहिजे. मतदान केलंच पाहिजे आणि करताना विवेक जागृत ठेऊन धर्म रक्षणासाठी मतदान केले पाहिजे.
यावेळेस सोसाटीचे अध्यक्ष श्री बसवराज गिरी, श्री धर्मा, श्री अनिल राजपूत, श्री श्रीनिवास देशपांडे आणि इतर बंधू आणि भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.दुग्ध पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.