•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन - रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

विश्व संवाद केंद्र - पुणे 17 days ago
बातम्या  

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर (डावीकडील) आणि पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर

सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन - रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

 

पुणे, दिनांक १४ एप्रिलः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा आणि समतेचा संदेश आजही प्रासंगिक आहे. संविधान निर्मितीच्या वेळी त्यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याची गरज व्यक्त केली. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाने त्यासाठी प्रयत्न करायला हवे. समाजात समरसता आणि एकोप्याचा भाव निर्माण करणे हेच त्यांना अभिवादन ठरेल, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि रा.स्व.संघाचे अधिकारी उपस्थित होते. आंबेकर पुढे म्हणाले, तत्कालीन समाजापुढे अनेक अडचणी असतानाही डॉ. आंबेडकरांनी देश आणि समाजाच्या एकसंघतेसाठी प्रयत्न केले. भारतीय समाजातील विशेष करून हिंदू समाजातील एकता आणि आवश्यक त्या सुधारणांकरिता अतिशय ठोस प्रयत्न त्यांनी केले. संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान अतुलनिय असून, आज कोणीही काहीही म्हणत असले तरी संपूर्ण देश संविधानानेच चालतो. आपआपसातील हेवेदावे आणि भेद विसरून समरसतेच्या वातावरणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. अभिवादनानंतर सुनील आंबेकर यांनी समाजातील विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.