भारतीय परंपरा शिकवणी लावून कळत नाही
पुणे - दिनांक १६ ऑक्टोबर रोजी आंबेगावच्या स्प्रिंग मिडोज या सोसायटी मध्ये कोजागिरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या वेळेस श्री अंकुर उमेदकर यांनी " आपली संस्कृती आणि परंपरा" या विषयावर आपले विचार मांडले. श्री अंकुर उमदेकर हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत तसेच समाज कार्यकर्ते आणि व्याख्याते आहेत.
यावेळेस श्री अंकुर म्हणाले कि परंपरा हि शिकवणी लावून कळत नाही. त्यासाठी आपले वर्तन तसे पाहिजे त्यातूनच पुढच्या पिढीला संस्कृती आणि परंपरा कळेल.आपला स्वार्थ बाजूला ठेऊन ,आपल्या हातून समाजासाठी जास्तीत जास्त योगदान व्हावे हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे.आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण भजन, भोजन, भवन, भ्रमण, भाषा आणि भुषा(वेशभूषा) आपल्या संस्कृतीनुसार केले पाहिजे, भजन, भोजन, भ्रमण कुटुंबासहित केले पाहिजे. आज आपल्या संस्कृतीवर होणारे हल्ले परतवून लावायचे असतील तर भेद विसरून संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. तसेच जागरूक पणे आपल्या संस्कृतीला जे पोषक आहेत अश्या शक्तींना मतदान केले पाहिजे.
यावेळेस सोसाटीचे अध्यक्ष श्री होमेश्वर काशीवर, सचिव डॉक्टर दिलीप काशीवर , कोषाध्यक्ष श्री अमोल भोई , संचालक मंडळ श्री राहुल बलवे, श्री उमेश माळी, श्री अमित मानकामे , सौ योगिता धारक, श्री मयूर पेडणेकर ,श्री योगेश आलेकर आणि इतर बंधू आणि भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.दुग्ध पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.