
रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना
२०२५ हे वर्ष संघशताब्दीचे वर्ष आहे, त्याचे औचित्य साधत सांस्कृतिक वार्तापत्राने ' रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना ' या नावाने दिवाळी अंक प्रकाशित केला. हा अंक तीन विभागात केला गेला आहे.
पहिल्या विभागात आतापर्यंतचे सरसंघचालक यांच्यावरील लेख आहेत ज्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्वातील पैलू माणूस या पातळीवरून उलगडले गेले आहेत. तर दुसऱ्या विभागात संघातील ज्येष्ठ तसेच सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांचे अनुभव दिले गेले आहेत. आणि शेवटच्या विभागात संघाने आजवर केलेले कार्य तसेच त्याचे विविध पैलू उलगडले आहेत.
अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की सगळाच अंक प्रसंग आणि अनुभव यातून उलगडत जाणारा आहे.
थोडक्यात सांस्कृतिक वार्तापत्राने संघाला दिलेली ही मानवंदना आहे.