•  25 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

लोकनायक टंट्या भिल्ल - जनजातीतील एक क्रांतीकारक

शोभा जोशी (shobha joshi) 21 days ago
दिन विशेष   व्यक्तिविशेष  

                  लोकनायक टंट्या भिल्ल

                   जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

                                              राष्ट्रास्तव जे झिजले कण कण ,तेच खरोखर यशस्वी जीवन 
 
असे यशस्वी जीवन जगलेले अनेक क्रांतीकारक आपल्या भारत देशात होऊन गेले हे आपण जाणतो. मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे अनेक शूर वीर आपल्या देशात होऊन गेले त्यात जनजातीतील लोकही अग्रेसर होते.असेच जनजातीतील  एक क्रांतीकारक  टंट्या भिल्ल.

 

टंट्या भिल्लांचा जन्म  १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते.भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे.या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये  आगडोंब उसळे.त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली. ही सेना जनतेला लुटणार्‍या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती.टंट्या या लोकांची संपत्ती लुटत आणि गोर गरीबांमध्ये वाटून टाकत.कोणाच्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धाऊन जात.लोकांच्या सुख दुःखात समरस झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले.

 जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने टंट्या मामांनी इंग्रजांविरूध्द संघर्षास सुरूवात केली.इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरूंगात डांबले. पण तुरूंगात बंदिवासात राहाणे त्यांना सहन होत नव्हते.त्यांनी तुरूंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले. ५ सप्टेंबर १८५७ ला त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली. त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण घेतले आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने  लढण्यास सुरूवात केली.इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जग जंग पछाडले पण ते इंग्रजांच्या हाती लागेनात.
 
टंट्या मामांचा एक विशेष म्हणजे त्यांना उलटे चालण्याची कला अवगत होती.जेव्हा जेव्हा इंग्रज सेना त्यांना पकडण्यासाठी येई तेव्हा तेव्हा ते उलटे चालत जात.त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई.इंग्रज सैन्य बरोबर विरूध्द दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंट्या मामा निसटून जात. निमाड,बेतुल,होशींगाबाद या भागात त्यांचा जबरदस्त दरारा होता.

 

११ वर्षं त्यांनी ब्रिटिश सत्तेशी झुंज देऊन त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १०,५०० रू.रोख आणि पंचवीसशे एकर जमीनीचे बक्षिस जाहीर केले. 'टंट्या पोलिस 'नावाचे स्वतंत्र पोलिस दल निर्माण केले.गावा गावात पोलिस चौक्या वसवल्या, जमीनदार आणि सावकारांना मोफत शस्रे दिली. तरी हा वीर  ११ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन डोंगर दर्यासत तळपत होता.

 शेवटी इंग्रजांनी षड्यंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदौरला आणले.तिथून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले. शेवटी ४ डिसेंबर १८८९ ला त्यांना फाशी दिली.निर्घृणपणे त्यांचे शव पाताल पानी जवळ रेल्वे रूळांवर फेकून दिले.आजही तिथे त्यांचे स्मारक आहे.
 
आपली वीरता ,अदम्य साहस आणि इंग्रजांविरूध्द बुलंद आवाज उठवणारे टंट्या भिल्ल जनजातींचे लोकनायक बनले.त्यांना जनजातींचे राॅबिनहूड म्हणूनही संबोधले जाते.
 
शोभा जोशी 

 


- शोभा जोशी (shobha joshi)

  • लोकनायक टंट्या भिल्ल - जनजातीतील एक क्रांतीकारक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

शोभा जोशी (shobha joshi)

१९७३ ते १९९९ पर्यंत वालचंदनगर येथे वास्तव्य.

लग्नानंतर ९ वर्षांनी बाहेरून परीक्षा देऊन B A ची पदवी घेतली. पुण्यामध्ये १ वर्ष राहून टिळक एज्युकेशन काॅलेजमधून B Ed. केलं. त्यानंतर वालचंदनगरच्या वर्धमान विद्यालयात ३ वर्षं शिक्षिकेची नोकरी केली.

ही नोकरी चालू असतानाच वालचंदनगर इंडस्ट्रीने M S W (Master Of Social Work) या मास्टर डिग्रीसाठी स्पाॅन्सर केलं. १९८४ ते ८६ पुण्यात राहून कर्वे इन्टीट्यूट आॅफ सोशल सायन्स या काॅलेजमधून M S W  केलं

त्यानंतर वालचंदनगर इंडस्ट्रीत सोशल वेलफेअर आॅफिसर म्हणून १३ वर्षं नोकरी केली. डिपार्टमेंटच्या माध्यमातून<

 सामाजिक (3), रा. स्व. संघ आणि परिवार (1), इतिहास (4), जनजाती (4),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.