•  16 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक

विश्व संवाद केंद्र - पुणे 27 days ago
बातम्या  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक ! - प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी 

 

कोल्हापूर - भारतात लाखो मंदिरे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे भक्त आहेत. आपण जरी वेगवेगळे असलो, तरी जेव्हा देवासमोर येते तेव्हा आपण आपल्यातील वेगळेपण विसरून एकत्र येतो. त्याचप्रकारे हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. दादा महाराज, डॉ. सूर्यकिरण वाघ, राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. संजीवकुमार झाडे उपस्थित होते. 

प्रास्ताविक धर्मजागरण मंचचे श्री. सचिन पोवर यांनी केले, तर आभार श्री. सनतकुमार दायमा यांनी व्यक्त केले. या प्रसंगी धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी असणार्‍या विविध मान्यवरांचा स्वामिजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. अजित ठाणेकर, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे,  ह.भ.प. अनिल यादव महाराज, अधिवक्ता केदार मुनीश्‍वर, प्रमोद पावले, रवी मिसाळ, प्रणव भिवसे, माधव कुंभोजकर, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बापू महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या महाद्वारासमोर श्री रेणुकामाता दर्शन रथासमोर संत आणि मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या रथात देवीची अलंकारिक वस्रे, परशुराम कुंडातील जल, टाक आणि तीर्थाचा कलश असणार आहे.
श्री अंबाबाई मंदिरातून सकाळी 10.30 वाजता शुभारंभ झालं आणि देवीचा रथ पुढे लक्षतिर्थ वसाहत, वारे वसाहत, राजारामपुरी, सदर बाजार, कनान नगर, रमणमळा, कसबा बावडा मार्गे पुढे कसबा सांगावं कडे मार्गस्थ झाला....
शहरात रथाचे भाविकांनी जल्लोशात स्वागत केले उद ग बाई उद रेणुका देवीचा उद अश्या जायघोष भक्तांनी केला...विविध ठिकाणी स्वागत कमानी व बोर्ड लावण्यात आले होते .. रथावर फुलांचा वर्षाव करत अनेक भाविकांनी दर्शन घेतले...

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (35), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.