नामांतर चळवळ : समाजवादी व साम्यवाद्यांची भूमिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहास २० मार्च १९७७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दलित संघटना एकत्र आल्या असता, महाड सत्याग्रहाचा सुवर्ण महोत्सव व बाबासाहेबांनी १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय उभारून मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची रोवलेली मुहूर्तमेढ लक्षात घेता बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देण्यात यावे, अशी मागणी दलित पँथरसह अन्य दलित संघटनांनी केली.नामांतराच्या मागणीस त्या वेळी विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता. विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव संमत केला होता. जनता पक्ष, शेकापनेही नामांतरचा पुरस्कार करणारे ठराव संमत केले होते; पण याच वेळी दुसरीकडे स्वत:स गांधीवादी, समाजवादी, दलितांचे पाठीराखे म्हणविणाऱ्यांनी मराठवाडय़ाच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध सुरू केला होता.नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती. शेवटी १६ वर्षांच्या संघर्षानंतर१४ जानेवारी १९९४ रोजीया विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असानामविस्तार करण्यात आला.
चळवळीची पार्श्वभूमी
1972 साली दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, गावातील पाणवठ्यांवर पाणी भरता यावे, यासाठी दलित पॅँथरचं आंदोलन सुरू होतं. त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणी जोर धरू लागली.दलित युवक आघाडी ही नामांतरचा पाठपुरावा करत असे. 1977 सालीतत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. तसं आश्वासनही दिलं. मात्र 1978ला महाराष्ट्रात सरकार बदललं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं. विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली होती, आणि इथूनच खऱ्या अर्थाने नामांतराच्या रक्तरंजित इतिहासाला सुरवात झाली.
नामांतर चळवळ आणिकॉंग्रेस –
१९७८ साली केंद्रात जनता पार्टीचे सरकारहोते. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या आसपास विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण होताच वसंतदादांनी घुमजाव केले. औरंगाबादमधील एका पत्रकार परिषदेत दादांनी स्पष्ट केले, "कोणालाही सामाजिक वा शैक्षणिक संस्थेच्या नामांतरास परवानगी द्यावयाची नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्नच उद्भवत नाही! " महाडमध्ये दिलेला शब्द वसंतदादा सोयीस्कररीत्या विसरले होते.
१२ जानेवारी १९८० साली गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली नामांतराचा विरोध करण्यासाठी एक परिषद भरविण्यात आली होती या परिषदेमध्ये पुढील कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता -देवीसिंग चौहान, माजी केंद्रीय मंत्री (काँग्रेस),नारायणराव चव्हाण (शंकरराव चव्हाण यांचे थोरले बंधू), भाऊसाहेब वैशंपायन (काँग्रेसचे राज्यसभा सदस्य), विजयेंद्र काबरा (इंटकचे अ. भा. सरचिटणीस). यावरूननामांतर विरोधी चळवळ चालवणारे सर्वार्थाने कोण होते? हे लक्षात घेण्याची आवशक्यता आहे.
पुढे मराठवाड्यात ज्या दंगली झाल्या त्यामध्ये पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (PWP) या मार्क्सवादी पक्षाच्याआणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या समर्थकांचा या जाळपोळीत सहभाग होता.
नामांतर चळवळ आणि शरद पवार –
सततच्या समाज जागृती व आंदोलानामुळे विद्यापीठाच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली. मात्र1978 महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले,वसंतदादा पाटील यांचे सरकार कोसळून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद चे सरकार सत्तारूढ झाले. आणि येथूनच खऱ्या अर्थाने नामांतराच्या रक्तरंजित इतिहासाला सुरवात झाली. २७ जुलै 1978 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असी नामविस्ताराची लांबलचक घोषणा झाली. हि घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची संयुक्त परिषद घेउन केली. मुळात नामविस्तारास पॅंथरचा विरोध होता. यानंतर मराठवाडा व महाराष्ट्रात दंगली सुरु झाल्या.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा विषय जबाबदारीने हाताळला नाही.
नामांतर चळवळ आणि समाजवादी व साम्यवाद्यांची भूमिका –
गोविंदभाई, अनंतराव भालेराव, नरहर कुरुंदकर, बाळासाहेब पवारयाच बुद्धिवंत व त्यागी देशभक्त म्हणवून घेणाऱ्यांनीसुरुवातीपासून शेवटपर्यंत नामांतर विरोधकाचे नेतृत्व केले. गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा परिषद भरवली गेली. मराठवाड्याच्या विकासासाठी भरवलेली ही परिषद १२ जानेवारी १९८० साली भरली. परिषदेचे पहिलेच तीन ठराव विद्यापीठ नामांतरासंबंधी आहेत.
ठराव :-
१) नामांतर लादले जाता कामा नये.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक म्हणून तंत्रज्ञान विद्यापीठ काढावे.
३) विधिमंडळाचा ठराव एक राजकीय अनुभव आहे.
या परिषदेचे अध्यक्ष देवीसिंग चौहान, माजी केंद्रीय मंत्री (काँग्रेस) व कार्याध्यक्ष - गोविंदभाई श्रॉफ मराठवाड्यातील समाजवाद्यांचे मार्गदर्शक हे होते वअनंतरावभालेराव व नांदेड येथील प्रमुख समाजवादी कार्यकर्ते श्री. स. दि. महाजन हे देखील या परिषदेचे सदस्य होत.
नामांतर चळवळ आणि रा.स्व. संघ –
एकीकडे समाजवादी, साम्यवादी मंडळी तर दुसरीकडे शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचा नामांतरासाठी कायम विरोध असतानीरा. स्व. संघ व त्यांच्या समविचारी अन्य संस्था व संघटना या सुरुवातीपासून नामांतरवादीच राहिल्या आहेत. लाँगमार्च निघाला, त्यावेळी सध्याचे औरंगाबाद शहराचे संघचालक प्रसिद्ध उद्योगपती श्री. सुधीर देशपांडे आणि भा. ज. पा. चे प्रांताचे सरचिटणीस आ. जयसिंग गायकवाड हे लाँगमार्च सत्याग्रहात सहभागी होऊन कारागृहात जाऊन आले. मराठवाड्यात आ. हरिभाऊ बागडे, दादा लाड यांच्यासारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांनी संतप्त जमावाला हिंसाचार, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यापासून रोखले.
जनसंघ, अ. भा. वि. प. यांनी त्यांची भूमिका वेळोवेळी मांडली. श्री. गोपीनाथराव मुंडे यांनी परळी व मुंबईतही नामांतरासाठी सत्याग्रह, धरणे, निदर्शने सर्व कार्यक्रमांत अनेकदा सहभाग घेतलेला आहे.मुंबईत डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड मोठा मेळावा आयोजित केला होता. हे सर्व कार्यक्रम सामाजिक समरसता मंचाने केले. अ. भा. वि. प. ने डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव व त्यांच्या दप्तरी पत्रव्यवहारात गेली दोन वर्षांपासून रूढ केलेले होतेच. संवादपथके ग्रामीण भागात पाठवून डॉ. बाबासाहेबांसंबंधी अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला.
या काळात समाजवादी आणि साम्यवादी मंडळींनी मराठवाडा परिषद भरवून नामांतरास विरोध दर्शविला परंतु 'दलित चळवळीने हा विषय अत्यंत नेटाने दरवर्षी मोर्चे, निदर्शने, प्रचंड प्रमाणावर वेळोवेळी करून विषयाची तीव्रता कमी होऊ दिली नाही.अटल बिहारी वाजपेयी, वि. हिं. प. चे नेते अशोकजी सिंघल व रा. स्व. संघाचे सहकार्यवाह हो. वे. शेषाद्रींनी विद्यापीठ नामांतराला पाठिंबा तर व्यक्त केलाच; परंतु विरोध करणाऱ्यांना बाबासाहेब आपले राष्ट्रपुरूष आहेत, त्यांच्या नावाला विरोध करणे बरोबर नाही, असे आवाहनही केले. सामाजिक समरसता मंचाच्या वतीने 'नामांतर आणि दलित चळवळी' असा विशेषांक काढून त्याचा प्रचार पूर्ण महाराष्ट्रभर केला होता. या संबंधी अनेक दलित नेते, साहित्यिक यांनी संघ व संघ परिवाराचे अभिनंदन केले आहे.
रा. सू. गवाई, राष्ट्रीय अध्यक्ष रि. पा. ई. (औरंगाबाद येथे 'नामांतरातून हृदयांतर' पुस्तकाचे प्रकाशन करताना ) म्हणतात "अ. भा. वि. प. व भा. ज. पा. ने नामांतराबाबत . आक्रमक भूमिका घेतली. त्याचे कौतुक करणे ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून मी त्यांचे कौतुक करतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी परिषदेने आदर सत्कार मिळवला. आपण राष्ट्रीय कार्य केलेत."
प्रा. डॉ. दि. गो. धुळे (रसायन शास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) म्हणतात“तब्बल १५ वर्षानंतर १९९३ मध्ये पुन्हा नामांतराच्या मागणीने जोर धरला. राजकीय समीकरणे नव्याने मांडण्याची गरज निर्माण झाली. या वेळेस मात्र संघ परिवाराने अत्यंत स्पष्टपणे राजकीय समीकरणांचा विचार न करता निर्भिडपणे नामांतराच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. असंख्य कार्यकर्ते गावोगावी जाऊन दलितेतरांना समर्पकपणे प्रश्नसमजावून सांगू लागले आणि त्यांच्या या अथक परिश्रमामुळे बऱ्याच प्रमाणात सामंजस्य निर्माण होण्यास मदत झाली.”
तत्कालीन मुखमंत्री शरद पवारदि. ६ जानेवारीस पुण्यातल्या परंदवाडी पत्रकार परिषदेत म्हणतात " रा. स्व. संघ आणि भा. ज. पा. चे कार्यकर्ते विद्यापीठ नामांतरासंबंधी प्रामाणिकपणे समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. "
संदर्भ –
1.नामांतर ते नामविस्तार काही घटना, काही घडामोडी– सुखदेव नवले
2. नामांतर आंदोलन आणि अभाविप
3. दगाबाज – एम.बी.पाटील
- विवेक विचार मंच,महाराष्ट्र