•  17 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

रा. स्व. संघातर्फे मोतीबागेत स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) today
बातम्या  

रा. स्व. संघातर्फे मोतीबागेत स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण 

डॉ. वामन पारखी, भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण; ‘एकता’च्या विशेषांकाचे प्रकाशन

पुणे, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ : 
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागाच्या वतीने मोतीबागेत ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सनदी अधिकारी डॉ. वामन पारखी आणि रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झाले.

याप्रसंगी बोलताना डॉ. पारखी यांनी गेल्या ८० वर्षांतील आर्थिक बदलांचा आणि भारताच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 'आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना' या उक्तीचा संदर्भ देत, विठूमाऊलीरूपी भारतमातेच्या प्रगतीसाठी सर्वांनी तुकोबारायांप्रमाणे स्वतः 'बि-घडण्याचे' (समर्पित होण्याचे) आवाहन डॉ. पारखी यांनी केले. तर, 'भारत हा अनादी, अनंत आणि अवध्य आहे,' असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

- स्वातंत्र्यसैनिकांची उपस्थिती आणि 'वंदे मातरम्'चे गायन: 
दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक अरविंद मणेरीकर यांनी वयाच्या ९५ व्या वर्षीही या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. तसेच, पूर्वांचलातील आठ विद्यार्थिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत 'वंदे मातरम्'चे संपूर्ण गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याच कार्यक्रमात 'एकता' मासिकाच्या 'पश्चिम बंगाल' विशेषांकाचे भय्याजी जोशी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संपादिका रूपाली भुसारी उपस्थित होत्या.

याप्रसंगी रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव, संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, पश्चिम क्षेत्र संपर्कप्रमुख कैलास सोनटक्के, अयोध्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव जगदीश आफळे, महानगर प्रचारक रोहित रिसबूड, मोतीबाग नगर प्रचारक प्रतीक परळीकर, मोतीबाग नगर संघचालक शरदराव चंद्रचूड, सहसंघचालक मुकुल पाटगावकर, कसबा भाग कार्यवाह राहुल पुंडे, मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे विश्वस्त प्रसाद खेडकर, किरण गांधी, प्रकाशराव आठवले, अप्पा मणेरे आणि राजेंद्र वालेकर आदींनीही उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले; तर सूत्रसंचालन विश्वस्त उदय पंचपोर यांनी केले. या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला महिला व पुरुष मिळून सुमारे १७० नागरिक उपस्थित होते


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण
  • रा. स्व. संघ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (193), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (70), रा. स्व. संघ आणि परिवार (88), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.