•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

गोदावरी घाटावर सनातन परंपरेने नित्य प्रज्वलित होणारी महाआरती

विश्व संवाद केंद्र - पुणे 2 days ago
बातम्या  

 

गोदा आरतीची परंपरा अत्यंत स्तुत्य - रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांचे प्रतिपादन 

नाशिक, दि १५ - प्रतिनिधी
आरतीचे स्वरूप, दीपांच्या सौंदर्यसंपन्न लहरी, मंत्रध्वनींच्या नादामध्ये आरक्त झालेले सायंकाळचे गंगेचे दृश्य मनाला भावले. गोदावरीच्या महाआरतीचे संपूर्ण दर्शन विलक्षण विलोभनीय आहे. आरतीची परंपरा केवळ धार्मिकच नाही, तर राष्ट्रहिताच्या व्यापक दृष्टीकोनातूनही अत्यंत स्तुत्य आहे. त्याचबरोबर नदीचा सर्वांगीण विकास आणि तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक तेज पुन्हा उजळविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. गोदावरी घाटावर सनातन परंपरेने नित्य प्रज्वलित होणाऱ्या महाआरतीमध्ये ते नुकतेच सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

देशभरात सध्या सकल हिंदूंचे एकीकरण घडत आहे. त्या प्रक्रियेमध्ये गोदावरी महाआरतीचे योगदान अतिशय मोलाचे आणि प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले. प्रथमत श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गोदा आरतीला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे कार्यवाह जयंत गायधनी यांनी आरती समितीच्या विविध उपक्रमांची व कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. समितीचे उपाध्यक्ष प्रभू नरसिंह कृपादास यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करत या उपक्रमाचे महत्त्व उलगडून सांगितले. सदस्य शिवाजी बोंदार्डे यांनी स्मृतिचिन्ह, वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन कृष्णगोपाल यांचा सन्मान केला. सचिव मुकूंद खोचे यांनी समितीच्या वार्षिक उपक्रमांची माहिती देत उपस्थित मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. 

राष्ट्रप्रेमाने भारावला गोदाघाट

देशभरातील विविध सैनिकी प्रशिक्षण केंद्रांतून आलेले २०० हून अधिक युवा सैनिक गोदा आरतीत सहभागी झाले. यावेळी जवानांनी भारत माता की जय व वंदे मातरम् चा जयघोष करत संपूर्ण घाट परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेल्याचे दिसून आले. गोदावरी मातेला वंदन करत भारतमातेच्या रक्षणासाठी बळ प्राप्त होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. गोदा आरतीला जवानांची उपस्थिती हा केवळ धार्मिक सहभाग नव्हता, तर गोदा तीरावर भारतीय संस्कृती, अध्यात्म व देशसेवेचा एकत्रित संगम यावेळी दिसून आला.

 

 

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • गोदावरी घाटावर सनातन परंपरेने नित्य प्रज्वलित होणारी महाआरती
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.