•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

जनजाती उद्योजकता व डिजिटल भारत : नवसंस्कृत भारताचा समृद्धी महामार्ग

विश्व संवाद केंद्र - पुणे 17 days ago
'अर्थ'पूर्ण  

जनजाती उद्योजकता व डिजिटल भारत : नवसंस्कृत भारताचा समृद्धी महामार्ग 

 

भारत आज विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. ज्यामुळे दीर्घकाळ उपेक्षित व केवळ मतपेढीचे साधन मानले गेले असे जनजाती समाजाचे घटकही आता उद्योजक, नवप्रवर्तक आणि डिजिटल क्रांतीचे वाहक ठरत आहेत. ही केवळ आकड्यांची बाब नाही तरी सांस्कृतिक पुनर्जागरणाची नांदी आहे, तिच्या केंद्रस्थानी जनजाती सशक्तिकरण व डिजिटल भारताच्या धोरणात्मक एकत्रिकरण आहे हे निश्चित. जनजाती समुदाय भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८.६% आहे, आणि भारतात सुमारे ६०० पेक्षा जास्त वेगवेगळया जनजाती असूनही त्यांची मूळ मूल्य प्रणाली एक आहेत, हेच यांना इतरांपेक्षा विशिष्ट आणि एकनिवासी करतो. हा समाज राष्ट्राच्या केंद्रस्थानी असून राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून जनजाती असून भारताचा आदिम आणि मूलगामी संस्कृतीचा वाहक आहे.

- स्वप्निल शिवराम कुमरे 

- वनातून विकासाकडे वाटचाल 
वनातील जीवनशैली, स्थानिक ज्ञान प्रणाली, पर्यावरण साक्षरता आणि जैवविविधतेचे जतन हे केवळ जगण्याचे साधन नव्हे तर राष्ट्र उभारणीचा आधार बनवण्याचे कार्य गेल्या काही वर्षात जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहे. याचेच उदाहरण म्हणून 'वन धन योजना' ही योजना जंगलातून जागतिक बाजारपेठेकडे नेण्याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले, ही केंद्र सरकारची क्रांतिकारी योजना ठरली आहे , यामध्ये स्थानिक जनजाती समूह लघु वनउपज मूल्यवर्धन करून स्वयंरोजगारांसाठी सक्षम करण्यात आले.यामध्ये देशभरात ३००० पेक्षा 'वन धन केंद्र' उभारण्यात आली, ९ लाख अधिक जनजाती लाभार्थ्यांचे महुआ, साल,बिया, हळद, मध, इत्यादी वन उत्पन्नाचे ब्रँड व विक्री सुरू केले. ट्रिबेस इंडिया(TRIBES INDIA), ॲमेझॉन(AMAZON), गोरमेंट इ मार्केट(GeM) प्लेस सारखा प्लॅटफॉर्म विक्री सुरू झाली आणि ते मुख्य प्रवाहात येऊ लागले. ही योजना आर्थिक  निर्भरतेसह सांस्कृतिक अभिमान जागवणारी ठरली आहे. त्यातल्या त्यात आपण महिलांचा सहभाग बघितला तर २०१४ नंतरचा कालखंडात जनजातीय महिला उद्योजकासाठी अधिक व्यापक प्रमाणात संचित पद्धतीने आणि आर्थिक समावेशनासह निरंतर मिळणारा पाठिंबा दिसत आहे जो २०1४ पूर्वीच्या विस्कळीत आणि अनौपचारिक सहभागाच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरतो. मोदीजीचा सबका साथ मध्ये जनजातीय महिला  मागे राहिलेल्या नाहीत, त्रैफेड(TRIFED) रिपोर्ट नुसार २०१४ नंतर स्टँड अप योजनामुळे  जनजातीय महिलासहभाग हा ७० ते ८० %  वाढलेला आहे.  

- डिजिटल दिशा : एक  सक्षमीकरनाकडे वाटचाल 
डिजिटल भारत जनजाती भागात तंत्रज्ञानाचा प्रकाश, पूर्वी जिथे रस्ते पोहोचत नव्हते तिथे आज डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचत आहे.डिजिटल भारत मिशन अंतर्गत सीएससी कॉमन सर्विस सेंटर, भारतनेट अजून  जण धन आधार मोबाईल त्याला जैम ट्रिनिटी(JAM Trinity) म्हटलं गेला या त्रिमूर्तीमुळे जनजाती भागात डिजिटल सुविधा पोहोचल्या आहेत. गडचिरोली, मेळघाट दंडेवाडा, येथे टेली मेडिसिन, डिजिटल प्रशिक्षण सुविधा देत आहेत. आदिवासीच तरुण सीएससीच्या माध्यमातून जीएसटी नोंदणी आधार अपडेट ई पासपोर्ट सेवा सेंटर सरकारी अर्ज प्रक्रिया इत्यादी चालू आहे. पंतप्रधान मोदीजी म्हणतात की डिजिटल योजना ही भारतातील शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे. विशेषत पीएम जनमान (PMJANMAN) नवसंधी नव दृष्टी या 2023 मध्ये सुरू झालेली योजना  'पर्टिक्युलर वर्णन ट्रायबल ग्रुप(PVTG)' अर्थात अत्यंत दुर्बल जनजाती समूहाकरिता समर्पित आहे. ही योजना संपूर्ण अंत्योदय तत्त्वावर आधारलेली आहे, जिथे विकासाच्या सर्वात शेवटच्या टप्प्यावर असलेल्या घटकांना केंद्रस्थानी आणले जाते रस्ते आरोग्य केंद्र पाणीपुरवठा शिक्षण सुविधा मोबाईल टावर डिजिटल साक्षरता स्किल ट्रेनिंग स्टार्टअप फंडिंग या योजना जनजाती सशक्तीकरणाला कल्याणाच्या सोबतच भागीदाराच्या दिशेनेही नेत आहे.
 
महाराष्ट्र आपण बघितला गेला तर जनजाती समावेश यशस्वी प्रयोग राबविले जात आहे. जसे की एकलव्य निवासी शाळा आणि डिजिटल अभ्यासक्रम त्याचे वाढवण्यात आले आहे. बांबू मिशनद्वारे जनजाती कारागीरांना निर्यात रेशम बनविले गेले. गडचिरोलीमध्ये बांबू फॅक्टरी उभारण्यात आली. गडचिरोली मेळघाट नदुरबार येथे डिजिटल रुग्णालय आणि जलद रक्षक सुविधा निर्माण झाल्यात आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले भारताचे विकास म्हणजे भारताचे वनवासी सशक्तिकरण हेच होय.
 
- नवसंस्कृत भारत : समृद्धीकडे वाटचाल 
विकास आणि संस्कृतीच्या संगमाने सर्व बदल केवळ धोरणाचा भौतिक परिणाम नाहीत तर ते एक सांस्कृतिक दृष्टिकोनही दर्शवतात. नवसंस्कृत भारत ही संकल्पना हिंदू संस्कृती पूर्णस्थापनाच्या माध्यमातून आधुनिक भर उभारण्याची कल्पना आहे, जिथे संस्कृती तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भवता याचा संगम घडतो. भारत हा एक संघ आहे आणि त्या संघातला हे जनजाती समाज केवळ संरक्षणास पात्र नाही तर राष्ट्राच्या मूळ आत्म्याचा भाग आहे. ज्यांचे स्वाभिमान परंपरा आणि योगदान गौरवाने स्वीकारणे आवश्यक आहे समृद्धी महामार्गवर भारत आजचा भारत समावेशी पण समर्थ या तत्वाने वाटचाल करत आहे जनजातीय उद्योगजकता व डिजिटल सक्षमीकरण हे केवळ विकासाचे साधन नाही, तर हे एक नवभारत जोडण्याचे शस्त्र आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या शब्दात सांगायचे तर जनजाती युवा मागे नाहीत ते पुढे आहेत त्यांचा कौशल्य आणि संस्कृती दोन्ही जागतिक पातळीवर मान्यता मिळवत आहेत. हा महामार्ग आर्थिक समृद्धीकडे नाही तर तो एक नवं संस्कृत भारताचा उभारणीकडे वाटचाल करतो आहे, जिथे संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संतुलित समर्थ भारताला अखंड व विश्वगुरू बनवेल.

- स्वप्निल शिवराम कुमरे 
वरिष्ठ संशोधक(यूजीसीं नेट एसआरफ, सेट)
लोकप्रशासन विभाग 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
छत्रपती संभाजीनगर

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • जनजाती
  • विकास
Share With Friends

अभिप्राय

सुंदर माहिती दिली आहे
अनिल पाटील 15 Jun 2025 05:15

अप्रतिम मांडणी
श्याम शिरसाठ 14 Jun 2025 19:22


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.