•  03 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पंचपरिवर्तन हाच हिंदुत्वाचा आजचा युगधर्म : दत्तात्रेय होसबाळे

विश्व संवाद केंद्र - पुणे 15 days ago
बातम्या  

पुण्यात आयोजित कुटुंब प्रबोधन कार्यक्रम

पुणे, दिनांक १६ मे २०२६ ः "हिंदूंचे संघटन हा हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा 'पंचपरिवर्तनाचा' मंत्रच आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान येथे आयोजित अनंत आणि पद्मा बिरादार परिवाराच्या स्नेहमिलन व कुटुंब प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर वीरशैव लिंगायत जगद्गुरू वचनानंद महास्वामी उपस्थित होते.  सरकार्यवाह होसबाळे म्हणाले, "व्यक्तिनिर्माण आणि समाज संघटन हा संघाचा मूळ गाभा आहे. परंतु, युगानुकूल समाजपरिवर्तनासाठी संघाने पंचपरिवर्तनाचा विचार मांडला आहे. जन्माच्या आधारावर होणारा भेदभाव हा ईश्वरविरोधी असून, त्याला हिंदू समाजात अजिबात स्थान नाही; समाजातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ कायदे करून चालणार नाही, तर ते संस्कारातून रुजवावे लागेल. नागरिकांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. कुटुंब हे राष्ट्राचे आर्थिक आणि सामाजिक एकक आहे. याच कुटुंबव्यवस्थेमुळे भारताने हजारो वर्षे परकीय आक्रमणांचा यशस्वी सामना केला. मात्र, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे." 

"समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित असणाऱ्या संघाच्या प्रचारकांमुळेच मी घडलो. त्यांच्या संपर्कातून प्रेरित होऊन मी समाजकार्य आणि निसर्गोपचार क्षेत्रात काम करू शकलो. संघामुळेच मला कामाप्रती समर्पण, संपर्क-संवाद, परिवारातील सामंजस्य आणि 'राष्ट्र प्रथम' हा विचार शिकायला मिळाला," अशी भावना अनंत बिरादार यांनी व्यक्त केली. मकरंद टिल्लू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
------
आधी हिंदू, मग लिंगायत : वचनानंद महास्वामी
"वैद्यकीय उपचार पद्धतीचे भविष्य हे योग आणि निसर्गोपचारातच आहे," असे सांगून वचनानंद महास्वामी म्हणाले की, "सध्या हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लिंगायत हे सर्वप्रथम हिंदू आहेत आणि नंतर लिंगायत आहेत, हा विचार स्पष्ट झाला पाहिजे."
---------


मातृभाषा यायलाच हवी! - सरकार्यवाह
"प्रत्येकाला स्वतःची मातृभाषा यायलाच हवी," असा ठाम आग्रह दत्तात्रेय होसबाळे यांनी या वेळी धरला. ते म्हणाले, "भारतातील प्रत्येक भाषेमध्ये जगातील श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झाले आहे. मुलांना परकीय भाषा जरूर शिकवा, परंतु मातृभाषा बोलण्यात कोणताही संकोच नसावा. भाषा आणि संस्कृतीबद्दल केवळ अभिमान बाळगून चालणार नाही, तर ती दैनंदिन आचरणात आणली पाहिजे."
--------
दत्तात्रेय होसबाळे म्हणाले...
- कुटुंब हा भारताचा प्राण : कुटुंबातूनच राष्ट्र घडते. भौतिक सुविधांमुळे केवळ 'घर' बनते, पण 'कुटुंब' हे केवळ आत्मीयतेतूनच तयार होते. भारतीय हिंदू जीवनपद्धतीतील कुटुंबव्यवस्थेचे जगभरात कौतुक होते. आज संयुक्त कुटुंब पद्धती कदाचित व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसेल, पण कुटुंबातील परस्पर संबंध, प्रेम आणि आत्मीयता टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
- सोशल मीडियाचे आव्हान: आज सोशल मीडियाच्या आणि स्वार्थाच्या युगात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे कुटुंबे विखुरत चालली आहेत. अशा काळात नव्या पिढीला योग्य संस्कार देणे ही अधिक जबाबदारीचे कार्य झाले आहे. कुटुंबाला केवळ व्यवस्था न बनवता, ते संस्कारांचे केंद्र बनवले पाहिजे.
--------------
 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सरकार्यवाह
  • दत्तात्रेय होसबाळे
  • पुणे
  • कुटुंब प्रबोधन
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (58), सामाजिक (110), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (44), संस्कृती (40), जनजाती (17), महिला (15), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (28), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (14), सेवा (18), साहित्य (11), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

trending

आणीबाणी : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन, जनआंदोलन आणि लोकशाहीचे पुनरुज्जीवन

संघाच्या देशप्रेमाने प्रभावित होऊन जेपी यांनी 'संघ लोकशाही मानत नाही' हा काँग्रेसचा...
विश्व संवाद केंद्र - पुणे 8 दिवसांपूर्वी

 पुस्तक परिचय  दिन विशेष   संपादकीय शिफारस  मनोरंजन  पर्यावरण  'अर्थ'पूर्ण  आंतरराष्ट्रीय  मुलाखत   कायद्याचे बोल  संकीर्ण   बातम्या   पर्यटन  
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.