•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

भारताची व्यूहरचना - यथार्थ हिंदू जीवना दर्शाचे मनोहर दर्शन

सुनील देशपांडे 24 days ago
भाष्य  

 

पहलगाम येथील घडलेल्या इस्लामिक कौर्याविरुध्द भारतीय जनमत उद्विग्न, संतप्त झाले आहे. इस्लामिक कौर्याया कळणा-या प्रतिशोधाची अत्यंत आवश्यकता होती. सौभाग्यवश सर्वोच्च नेतृत्व हे जमिनीशी नाळ जोडलेल असल्याने जनभावना हीच सरकारची भूमिका असे स्वरूप निर्माण झाले आहे. व त्यामुळे पहलगाम व तत्सम सर्व इस्लामिक क्रूर आतंकवादाला सडेतोड उत्तर मिळणार याची खात्री होती.

पण ह्या भावनिक प्रसंगीसुध्दा भारत, भारतीय नेतृत्व व लष्कर हे हिंदू जीवनादर्श विसरले नाहीत. पहलगाम हे इस्लामिक आतंकवादाचे उदाहरण असल्याने भारताने आपली कृति दहशतवाद विरोधापुरती मर्यादित ठेवली. जो गुन्हा त्यासाठी शिक्षा. द्वेष हा कधीच कृतिचा आधार होऊ दिला नाही. सर्व जगाला भारतीय शौर्य व सुसंस्कृतता याचे एकत्र दर्शन झाले. विना अट सर्व जगाने भारतीय कृतिचे समर...
 

चर्वितचर्वण

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांवर हल्ला करुन ती स्थान उध्वस्त करून टाकली आहेत. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून जोरदार प्रतिक्रमणही झाले. पाकिस्तानला दहशत तर जगाला भितीयुक्त आश्चर्य वाटले आहे.

या सर्वांवर भरपूर चर्वितचर्वण झाले आहे व चालू आहे. ज्या गोष्टी कधीही प्रकाशात येणार नाहीत त्या आम्ही बरोबर सांगतो असे सांगणारे विद्वान यांना टिव्ही चॅनल्स नावाची नवीन करमणूक केंद्रे मिळाली आहेत.
अशा वेळी युद्धबंदी जाहीर झाली व देशभक्त भारतीय जरा निराश झाला. ज्याच्या वर भरवसा त्या नेत्याने अमेरिकेसमोर नांगी टाकली? असा एक अभासी दृष्टिकोन निर्माण झाला. व या दृष्टीने जेवढ्या बारकाईने पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे विश्लेषण व्हायला हवे होते तेवढे अजून झाले नाही..
म्हणून हे अजून एक चर्वितचर्वण.
एक देशाला दिशा देणारे, मूलभूत भूमिका सुस्पष्ट करणारे, सामान्य मनातील सर्व शंकाना स्पर्ष करणारे, जगाला जाणीव करून देणारे असे सर्व एकत्र असलेले एक मुत्सद्दी कुटनितीज्ञाचे भाषण म्हणून हे एक मैलाचा दगड ठरणारे भाषण आहे.
पूर्व सुरीच्या भुमिकांपासून पूर्ण फारकत घेतलेली भूमिका या भाषणात मांडली गेली आहे. आतंकवादाविरुध्द zero tolerance म्हणजे फक्त निषेध नाही तर त्याचा पूर्ण बिमोड ही भूमिका व तेवढीच भूमिका मांडली व फक्त भाषणात नव्हे तर कृतितून. प्रथम उरीमध्ये एअर स्ट्राइक व यावेळचे दुस-या देशात घुसून अतिरेकी स्थान नष्ट करणे.
यातून व या वेळच्या भाषणातून संदेश स्पष्ट दिला की आमच्या लोकांच्या रक्षणासाठी दुस-या देशाच्या सार्वभौमत्वाचा घास घेण्यास भारत मागे पुढे पहाणार नाही, मग जग युद्धखोर म्हटल तरी चालेल. ही भूमिका कूटनिती म्हणून एवढी महत्वाची आहे की पाकिस्तानला युध्द विराम झाला तरी उद्या काय होईल हे भय कायम राहिलं आहे.

या बरोबरीने आम्ही उगाच आक्रमकवादी नाही तर जेवढे उद्दिष्ट तेवढीच कृति हे भाषणातून अधोरेखित केले व हीच भारत जीवन दृष्टी आहे हेही बरोबर बौध्द जयंति दिवशी तथागतांचा उल्लेख करून अधोरेखित केले .
त्याच बरोबर समाज रक्षणासाठी कोणत्याही स्तरावर जाणार हे एवढ्या जोरात सांगितले की जणू काही पाकिस्तान व पूर्ण जगाला सुद्धा धमकी वाटावी अशी समज दिली. त्यासाठी शब्द योजनाही अचूक होती. Terror & Talk, व खून व पाणी एकत्र वहाणार नाही असे सांगून सिंधू करार तुटला हे स्पष्ट केले. न्युक्लिअर black mailing खपवून घेणार नाही हा संदेश वा धमकी सर्व विकसित जगाला दिली.
त्यांच्या कूटनीतिपूर्ण भाषणातील सर्वात शक्तिशाली वाक्य ही न बोललेले मौन होते. अमेरिका व चीन या बड्या राष्ट्रांना अनुल्लेखाने मारले. हे आक्रमण आम्ही थांबवले कारण पाक शरण आला व आमचे इप्सित कार्य पूर्ण झाले म्हणून. कोणी मध्यस्ती केली म्हणून नाही.
या युध्दमय वातावरण व समाजातील एकात्मिक जोशाचा फायदा घेऊन पाकिस्तान व जगाला सांगितले की पाकिस्तान बरोबर बोलणी फक्त दहशतवाद व पाक व्याप्त काश्मीर या वरच होणार व कोणाही मध्यस्ता विना होणार. म्हणजे पाकिस्तानला जगाचा काही उपयोग नाही हे स्पष्ट करुन टाकले. भारताच्या शस्त्रसज्जतेची अधिकृत व्यासपिठावरून जाहीर वाच्यता केली. व आक्रमकता ही आमच्यासाठी संकट नसून संधीच असणार हे ही सांगून टाकले. व सर्वात महत्वाची गोष्ट केली की यापुढे दहशतवादी कृत्य घडले तर ते दहशतवादी व त्याला पाठबळ देणारे सरकार, देश यांना आक्रमण समजून कोणत्याही थराची कारवाई केली जाईल.

फक्त २०/२२ मिनिटांच्या भाषणात पहलगाम घटनेचं दु:ख पिडा , समाजाच्या मनातील मरगळ घालवून, पाकिस्तानला धमकी, जगाला समज दिली. Operation Sindoor is a continuous process हे ही स्पष्ट केले. तसेच भारतातील झारीतील शुक्राचार्यांनासुध्दा अनुल्लेखाने मारले.
व फार महत्वाचे म्हणजे या कृतीचे नाव सिंदुर ठेवले एवढेच नाही तर सिंदुर ही हिंदू संकल्पना जी आहे, त्या अर्थानेच वापरलेली आहे, हे ही स्पष्ट केले.
म्हणून या भाषणावर खूप अधिक विचार व्हायला पाहिजे. किलोचित परिवर्तनाला तयार भारत हा नव भारत आहे हे भारताच्या कृतितून कळत आहे. ते फक्त देशभक्ती नाही, ते फक्त आतंकवाद विरोधी नाही, ते फक्त तात्कालिक नाही, ते फक्त made in India नाही तर हे सर्व मिळून आहे. व फक्त सरकार नाही तर तर संपूर्ण समाजाच्या चैतन्याचे प्रतिक आहे म्हणून हे भाषण एवढे महत्वपूर्ण आहे. समाज, देश व नेता यांच्या एकत्रित चिंतनाचे प्रतिक आहे. म्हणून चैतन्यमय व शक्तिशाली आहे.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२


- सुनील देशपांडे

  • भारताची व्यूहरचना - यथार्थ हिंदू जीवना दर्शाचे मनोहर दर्शन
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

सुनील देशपांडे

सुनील  देशपांडे 

 संस्कृती (1), हिंदुत्व (1), रा. स्व. संघ आणि परिवार (1), माध्यमे (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.