•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

अविरत समाजकार्याची तीन दशके

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 24 days ago
भाष्य  

 अविरत समाजकार्याची तीन दशके

   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून संघसमार्पित कार्यकर्त्यांनी स्थापन केलेली समाजसेवी संघटना म्हणजे पुण्यातील   केशव माधव विश्वस्त निधी. या संस्थेने स्थापनेपासून आणि अलिकडील काळात केलेल्या कामाचा हा परामर्ष.

   "अविरत श्रमणे संघजिणे" या उक्तीप्रमाणे पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी   सामाजिक  बांधिलकीच्या जाणिवेतून शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य विषयक तसेच समाज प्रबोधन विषयक उपक्रम   घेण्याच्या दृष्टीने स्थापन केलेली संस्था म्हणजे केशव माधव विश्वस्त निधी ही होय.

   जेष्ठ स्वयंसेवक व माजी कर्वेनगर संघचालक सदानंद (नंदाजी )भागवत,संजीव बेंद्रे,उल्हासराव सावळेकर,बापू घाटपांडे,नानासाहेब उंडे,जयसिंगराव कुलकर्णी,डॉ दादासाहेब पुणतांबेकर,मेजर सुधीर कुंटे,चिंतामण मार्तंड कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन संस्था स्थापन केली.मा.धर्मादाय आयुक्त,पुणे यांचेकडे याची रीतसर नोंदणी करण्यात आली. १९९८ या वर्षी परंतु संस्थेचे कार्य चालू होते त्या अगोदरपासून.सुरवातीच्या काळात आरोग्य,आध्यात्मिक विषयावर व्याख्यानमाला घेत असत. बाल विज्ञान प्रकल्प चालवला.हळू हळू काम वाढत गेले. आता संस्थेकडे ८०-जी प्रमाणपत्र तसेच सीएसआर.साठीचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे. संस्थेचे दरवर्षी ऑडिट होत असते. सुरवातीला समाजातील- वस्तीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना शिक्षण घेतांना आर्थिक अडचण येऊ नये ह्या उद्देशाने संस्था कार्य करत गेली. वस्तीतील होतकरू व गरजू मुलांना आर्थिक मदत करणे, शालेय शिक्षण साहित्य मदत,आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिरे,संस्कार शिबिरांचे  आयोजन,विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व समजावे म्हणून योग दिन,सूर्यनमस्कार स्पर्धा  असे अनेक उपक्रम संस्था सातत्याने घेत असते.

 

   शहरी भागातील वस्त्यांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम घेतले.स्वयंसेवक भालचंद्र खेनट यांच्या पुढाकाराने पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसे,सेवा सहयोग च्या सहकार्याने स्कूल किट वाटप,गावातील स्मशानभूमीमध्ये झाडे लावणे,बालवाडी मधील मुलांना खेळणी वाटप,’पाणी फाऊंडेशन’च्या कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग,जलयुक्त शिवार,शेततळे यासाठी कृषी-तज्ञ मार्फत मार्गदर्शन,विविध कृषी योजना,गो-प्रॉडक्ट चे प्रात्यक्षिक,सेंद्रिय शेतीचे महत्व, फळझाडा वरील कीड नष्ट करण्यासाठी विशेषज्ञ करून मदत असे विविध उपक्रम घेण्यात आले.

 

   राष्ट्रीय विचारांचे अभ्यासू वक्ते यांचे समाजप्रबोधन विषयक व्याख्यान आयोजित करण्यात येते.निवडणूक काळामध्ये पुण्यात महत्वाच्या साठ ठिकाणी केशव माधव विश्वस्त निधी,प्रबोधन मंच व कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या स्वयंसेवकांद्वारे पथनाट्ये सादर करून शंभर टक्के मतदानाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले.मतदान जागृती ची हजारो पत्रके घरोघरी वाटप केली.निवडणूक मतदान केंद्रावर नागरिकांना मदत करणे हे ही नागरी कर्तव्य समजून कार्य केले.दौंड तालुक्यातील वरवंड येथील दुर्गम ग्रामीण भागात प्राथमिक आश्रम शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष मदत केली.दौंड येथील मूक - बधिर संस्थेला आर्थिक मदत केली.मुळशी तालुक्यातील भुईनी या अति- दुर्गम भागातील गावामध्ये दरवर्षी ग्रामस्थांबरोबर प्रत्यक्ष दिवाळी साजरी केली जाते तसेच अत्यावश्यक गरज असलेल्या शेती अवजारे व घरेलु वस्तूंचे वाटप केले जाते.

 पुण्यातील कर्वे नगर परिसरातील पालकर शाळा,सरस्वती विद्यामंदिर,ज्ञानदा शाळेतील विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा व बक्षिसे वाटप केली. या वर्षी ज्यांचे पालक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहे जसे वॉचमन,कुरिअर बॉय,दवाखान्यात मावशी,घरेलु कामगार अशांची मुले शालांत परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तसेच नववी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना बक्षिसे देण्यात आली,यावेळी शाळेचे वर्गशिक्षक,मुख्याध्यापक,संस्थासचिव यांचा सन्मान केला. जनजाती -आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांचे विशेष करून कष्टकरी महिलांचे हिमोग्लोबीन खूप कमी असते त्यासाठी लागणारे ब्लड हिमोग्लोबीन टेस्टिंग मशीन संस्थेतर्फे डॉक्टरांना केशव माधव विश्वस्त निधी संस्थेच्या वतीने दिले. तसेच कुपोषण होऊ नये म्हणून पोषक आहारासाठी भरीव मदत केली गेली. ऑपरेशन सिंदूर वर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या सहकार्याने एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) यांनी अनेक ठिकाणी जाहीर व्याख्याने कार्यक्रम घेतले.

   पुण्यातील एरंडवणे भागात सेवा भवन येथील प्रकल्पास संस्थेच्या साठ स्वयंसेवकांनी भेट दिली.तेथे चालणार्‍या सर्व प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.माहिती करून घेण्यात आली.एरंडवणे येथे असलेल्या सेवा भवन मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे विविध सामाजिक कार्ये चालतात. तसेच अल्प दरामध्ये डायलिसिस केंद्र चालवले जाते. या केंद्रामध्ये त्यांच्या गरजेनुसार त्यांना दोन ऑक्सिजन सिलेंडर,दोन रेग्युलेटर तसेच एक मोठे वजन करण्याचे मशीन देण्यात आले. महात्मा सोसायटी गांधी भवन  कोथरूड येथील मतिमंद विद्यार्थांसाठी असलेल्या किशोरी पाठक यांच्या अब - नॉर्मल संस्थेस भेट दिली व  त्यांच्या गरजेनुसार त्यांना पंखे, इंडक्शन स्टोव्ह देण्यात आले.

   संविधान दिनाच्या दिवशी पद्मश्री रमेश पतंगे लिखित"आपले मौलिक संविधान" पुस्तके विविध देणगीदार नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन भेट देण्यात आली.

  "धुमसते मणिपूर" या विषयावर  मणिपूर येथील जयवंत कोंडविलकर यांचे सेवा भवन सभागृहामध्ये भाषण आयोजित केले होते. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.

   अविनाश बर्वे यांच्या कल्याण - डोंबिवली जवळ मतिमंद मुलांच्या केंद्रास धान्य स्वरूपामध्ये मदत केली.

   कर्वेनगर येथील सरस्वती विद्यामंदिर या शाळेस त्यांच्या विनंतीनुसार दोन कपाटे व दोन बुक रॅक देण्यात आली. गणेशोत्सव काळामध्ये वस्तीतील घरांमध्ये गणपती आरती व सामूहिक अथर्वशीर्ष वाचन असेही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

  चौकटः

  ४३ वस्त्यांमध्ये ८४ प्रकल्प

  "सेवा आरोग्य फाऊंडेशन ही पुण्याच्या पश्चिम भागात कर्वेनगर,कोथरूड,उत्तमनगर,वारजे,शिवणे,परमहंसनगर   वस्तीतील   नागरिकांसाठी अल्प दरामध्ये वस्तीमध्ये दवाखाने चालवते.वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत असते. तसेच   विविध   समाजोपयोगी प्रकल्प ४३ वस्त्यांमध्ये ८४ प्रकल्प राबवत असते. सेवा आरोग्य फाऊंडेशन च्या अनेक   शिबिरामध्ये   वस्तीतील आरोग्य शिबिरासाठी औषधी स्वरूपात मदत केशव माधव   विश्वस्त निधी तर्फे दिली   जाते.दीपावली निमित्त   धन्वंतरी पूजन कार्यक्रमाच्या दिवशी तेथील कर्मचार्‍यांना,वस्तीतील अती   गरीब कुटुंबियांना   दरवर्षी फराळ वाटप केले   जाते.

  (चौकटः सचिवांचे छायाचित्र आहे)

 सामाजिक कार्याची वाढवणार व्याप्ती

  "विविध उपक्रम व नवनवीन कल्पनाद्वारे संस्थेचे सामाजिक कार्याची व्याप्ती अजून वाढविण्याची,भविष्यात अधिकाधिक   कार्य करण्याची योजना असल्याचे केशव माधव विश्वस्त निधी या संस्थेचे सचिव अरविंद देशपांडे" यांनी मुंबई तरुण भारत   शी बोलून दाखवली. "समाजातील जास्तीत जास्त लोकांनी केशव माधव विश्वस्त निधी या संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग   घ्यावा व आर्थिक मदत करावी "असेही आवाहन यांनी यावेळी केले.

 

  चौकटः

  संस्थेचा पत्ताः

  अरविंद देशपांडे

  सचिव,

  केशव माधव विश्वस्त निधी,प्लॉट क्रमांक २३,

  उर्मी बंगला,

  कुलश्री गल्ली

  क्रमांक १,कर्वेनगर

  पुणे ४११०५२

  मोबाईल क्रमांक

  ९४२०१३६५६८

 

 - अतुल क. तांदळीकर

 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • जनजाती
  • आदिवासी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.