सर्व भेद विसरून हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक - ह.भ. प. गणेश महाराज सुरुलकर
हिंदू धर्म हा जाणून घेऊन आचरण करण्याचा जीवनमार्ग आहे असे ह.भ.प. गणेशमहाराज सूरुलकर यांनी ईश्वरपूर येथे सोमवार, दिनांक २८/१०/२०२४ रोजी श्री विठ्ठल देव ट्रस्ट आयोजित एकादशीनिमित्त प्रवचनामध्ये सांगितले.
संतांचे जीवन हे सर्वांमध्ये परमेश्वर पाहण्यास शिकवणारे आहे. मरावे परी किर्तिरुपे उरावे असे संतवचन आहे. असे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते कार्य करण्याचा मार्ग संतांनी समाजाला दाखवला.
देव कुठे पहावा हे सांगताना त्यांनी सांगितले की जड जीवच नव्हे तर वृक्ष वेलिंमध्ये आणि पशू पक्षांमध्ये ही परमेश्वर आहे. त्यामुळे सर्व हिंदू समाज हा एकच असून त्यामध्ये उच्चनीच असे कोणी नाही.
संतांनी आपल्या जगण्याचा हेतू काय असावा यासंबंधी आपल्या साहित्यातून मार्गदर्शन केले आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक देव असले तरी सर्व मार्ग एकच गंतव्य गाठण्यासाठी म्हणजेच मुक्तीसाठी असतात. हिंदू असण्याचा गर्व असला पाहिजे असेच आपल्याला संत सांगतात. सर्व भेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सध्याची लढाई जिंकण्यासाठी गनिमी कावा वापरून संतांच्या मार्गदर्शनानुसार आपण प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी १००% मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवतगीता व ज्ञानेश्वरी ग्रंथांचे पूजन करण्यात आले. भालचंद्र शिंगण यांनी प्रास्ताविक केले. श्री विठ्ठल देव ट्रस्टचे विश्वस्त सुहास वाळवेकर यांनी आभार मानले.