•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य - भैयाजी जोशी

विश्व संवाद केंद्र - पुणे 7 days ago
बातम्या  

भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य - भैयाजी जोशी

पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचा ८८ वा अभिष्टचिंतन सोहळा
चौथाईवाले लिखित 'मेरी प्रचारक यात्रा' पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन

पुणे, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ : पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत संघाचे (RSS) अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले लिखित 'माय जर्नी अॅज प्रचारक' (इंग्रजी) आणि 'माझी प्रचारक यात्रा' (मराठी) या अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात 'माय होम इंडिया' आणि 'भारतीय विचार साधना' यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भैयाजी जोशी यांच्यासह संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंतजी आमशेकर, लेखक शशिकांत चौथाईवाले, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, डॉ. विजय चौथाईवाले, भाविसाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी वयाचे ८८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शशिकांत चौथाईवाले यांचा अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी पार पडला.

भैयाजी जोशी म्हणाले, "उपेक्षा, अपमान आणि असुविधांचा सामना करत वेळप्रसंगी जीवाचेही बलिदान देत संघ प्रचारकांनी पूर्वांचलात काम केले. शाळा, सेवाकार्ये आणि जनजातींच्या प्रश्नांना उत्तरे शोधली. आपल्यातील भेद विसरून एक झाले पाहिजे, हा विचार तेथे रुजवला. त्यामुळे आज आसाममधील अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. झोकून देऊन कार्य करणाऱ्या अशा प्रचारकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व शशिकांतजी करत आहेत."

संघ कार्याचे यश एका व्यक्तीचे नसून, सामूहिक कार्यपद्धतीचे आहे, असे उद्गार शशिकांत चौथाईवाले यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. पूर्वांचलातील संघकार्याच्या वाढीबद्दल ते म्हणाले, "उग्रवाद जसा कमी होत गेला, तसे पूर्वांचलात संघाचे काम वाढत गेले. सेवाकार्यांमुळे आज सर्व भाषांचे लोक संघाशी जोडले गेले असून, हे संघ कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे."

आसाममधील ज्या जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रचारकांची हत्या केली, तेथून कार्यकर्ता उभा करत नवीन प्रचारक तयार करण्याचे कार्य शशिकांतजींनी केले आहे, असे गौरवोद्गार सुमंत आमशेकर यांनी काढले. 'माझी प्रचारक यात्रा' हे पूर्वांचलातील संघकार्याचा धांडोळा घेणारे पुस्तक आहे. एकप्रकारे ही पूर्वांचलातील संघयात्राच असल्याचे आमशेकर म्हणाले. पूर्वांचलातील संघकार्याचा खडतर प्रवास आणि शशिकांत चौथाईवाले यांची प्रतिबद्धता, समर्पण आणि धैर्याचा प्रवास सुनील देवधर यांनी उलगडला. अनेक कार्यकर्त्यांमुळे पूर्वांचलात संघ वाढला. त्यांचे जिवंत अनुभव या पुस्तकात असल्याचे डॉ. विजय चौथाईवाले यांनी सांगितले. दिल्लीतील प्रभात प्रकाशनाने पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला आहे. पुस्तकाचा अनुवाद प्रा. शिवशंकर मुजुमदार यांनी केला. कार्यक्रमात अनिल वळचनकर यांनी मानपत्राचे वाचन केले, तर सूत्रसंचालन अभय थिटे यांनी केले.
-----

राष्ट्रहितार्थ कार्यरत लोक संघाने घडवले

स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला विसरून केवळ राष्ट्रहितार्थ काम करणारे लोक संघाने घडविल्याचे भैयाजी जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ''विकसित व्हावे अर्पित होऊन जावे, या काव्यपंक्तीला अर्थ प्राप्त करून देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले. संघाच्या कामावर विश्वास दाखवत पूर्वांचलातील भीषण परिस्थितीत पाऊल टाकण्याचे कार्य प्रचारकांच्या पहिल्या पिढीने केले. मागचा-पुढचा विचार न करता आहे त्या परिस्थितीला तोंड दिले. अशा कंटकाकीर्ण मार्गावरून चालणाऱ्यांमुळेच संघ विस्तारला. संघाने केवळ विचार दिला नाही, तर आचारही दिला. अनुशासनाबरोबरच सत्त्व, सामर्थ्य आणि तपस्या करण्याचे सामर्थ्य स्वयंसेवकांत निर्माण केले. स्वयंसेवक नावाच्या शक्तीशी प्रचारक नावाचा गट उभा केला."
-----------
वरिल छायाचित्रात 
लेडी रमाबाई सभागृह, एस.पी.कॉलेज ः माय जर्नी अॅज प्रचारक आणि माझी प्रचारक यात्रा या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रा. रविशंकर मुजुमदार, सुनील देवधर, सुमंत आमशेकर, शशिकांत चौथाईवाले, भैयाजी जोशी, डॉ. गिरीश आफळे, डॉ. विजय चौथाईवाले.

------------


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • भैयाजी
  • संघ
  • प्रचारक
  • चैथाईवाले
Share With Friends

अभिप्राय

Very great full work
Ranjit Doifode 13 Aug 2025 19:43


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.