•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

कृतीतून माणुसकी,एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला – रतन शारदा

विश्व संवाद केंद्र - पुणे 18 days ago
बातम्या  

कृतीतून माणुसकी,एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला – रतन शारदा 

 

पुणे – दि. २ - आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी सुनीलराव खेडकर यांनी समर्पित केले. त्यांचे संघटन कौशल्य, संवाद कौशल्य आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कृतीतून माणुसकी आणि संघातून एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला आहे पण त्यांचे  समर्पण आपल्याला कार्याची प्रेरणा देते असे मत प्रसिद्ध लेखक डॉ. रतन शारदा यांनी व्यक्त केले. 


पुणे महानगराचे माजी प्रचार प्रमुख आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुनीलराव खेडकर यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले.  कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित त्यांच्या श्रद्धांजली सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, संभाजी भाग संघचालक अनिल व्यास उपस्थित होते. 
शारदा पुढे म्हणाले, सुनीलराव यांचे संघटन कौशल्य केवळ माणसांना एकत्र आणण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त क्षमता ओळखून त्यांना योग्य न्याय देण्यासाठी धडपडणारे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले.असेही ते म्हणाले. आपल्या पुस्तक निर्मितीत सुनीलराव यांचा मोलाचा वाटा असून ‘संघ आणि स्वराज्य’ हे पुस्तक त्यांनी यावेळी खेडकर यांना समर्पित करत त्यांच्या कुटुंबियांना दिले. 

यावेळी रवींद्र वंजारवाडकर म्हणाले की, सुनीलराव यांचे संवाद कौशल्य इतके प्रभावी होते की, अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या पदावरील व्यक्तींपर्यंत सर्वांशी ते सहज संवाद साधू शकत होते. त्यांच्या बोलण्यातून फक्त शब्दच नाही, तर आपुलकी आणि आपलेपणा जाणवत असे. सर्व कामात बारीकसारीक निरीक्षणे, अभ्यास आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन ते करत असत. पुण्यात विविध ठिकाणी बाल शाखा लागण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या एका शब्दावर कोणताही कार्यकर्ता कामाला लागायचा, हे त्यांच्या संवाद कौशल्याचेच यश होते.कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची सवय ही कामात यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. त्यांच्या प्रत्येक कामात स्पष्टता आणि अचूकता दिसून येत असे. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेली मूल्यांची वाटचाल आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. असेही ते म्हणाले. 


शिस्त, निष्ठा आणि समर्पण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन भक्कम आधारस्तंभ होते. स्थानिक तसेच प्रांत स्तरावर संघ कार्यामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जीवन म्हणजेच सेवा, त्याग व कर्तव्यभावनेचे मूर्तिमंत उदाहरण होते. युवकांचा  राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. कुटुंबातील सर्वांचा परिचय करून घेत प्रत्येकाला विविध पद्धतीने संघ कामात कसे आणता येईल यासाठी ते फक्त कार्यकर्ता नाही तर कुटुंबाशी जोडले गेले होते. संघ कामासोबतच आपल्या व्यवसायातील त्यांची शिस्त आणि सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना त्यांनी  ‘मित्रा’ संबोधून कायम जोडून ठेवले. त्यामुळे सुनीलराव सर्वांना आपले वाटले. असे मत त्यांच्या सोबत काम केलेल्या मित्र, व्यवसायिक, प्रचार विभागातील कार्यकर्ते, कौटुंबिक हितचिंतक यांनी व्यक्त केले. सत्यजित चितळे, सुहास देव, विराज देवडीकर,रुपाली भुसारी, सार्थक शिंदे आदिंनी यावेळी मनोगत व्यक्त केले. राजू चौथाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी खेडकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सुनीलराव खेडकर
  • श्रद्धांजली
  • कार्यकर्ता
  • संघ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.