
स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !!
भारतीय तिथीमिती नुसार वैशाख महिन्यातील वद्य पश्चातील द्वितीया, ही देवर्षी नारद यांची जयंती यंदा ती दिनांक १३ मे रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. भारतीय संचार माध्यमांचा आदिपुरुष असे त्यांचे कार्य व स्थान आहे. त्या काळी 'कीर्तन' हे समाज-समूहमन घडविणारे प्रभावी माध्यम होते. देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार आहेत. सकल जनसंपर्क, जनसंवाद, आणि सामाजिक हितैषीदृष्टिने सक्रिय भूमिका हे देवर्षी नारदांचे गुण आदर्श पत्रकारितेचा वस्तुपाठ आहे. आज संचारमाध्यमांचा विस्तार व प्रभाव वाढलेला आहे. ती ग्लोबल झाली आहेत पण त्यांची विश्वासार्हता प्रश्नांकित आहे. अशा काळात देवर्षी नारदांच्या विधायक व समाजहितैषी संज्ञापकतत्त्वांचे स्मरण अधिक गरजेचे आहे. पन्नास वर्षे पत्रकारिता केलेले, संत साहित्याचे अभ्यासक उपासक विद्यावर ताठे यांचे देवर्षी नारद चिंतन, स्मरण !!
लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये 'समूह मानस' घडविण्याचे कार्य प्रसार माध्यमे करीत असतात. नीरक्षीर विवेकाने समाजाच्या हिताचे दिशादर्शन प्रसार माध्यमांद्वारे अपेक्षित असते. आज प्रसार माध्यमांचे एकूण स्वरूप ग्लोबल झालेले आहे. पूर्वी वृत्तपत्रे, नंतर टीव्ही वाहिन्या पुरते मर्यादित असणारे क्षेत्र 'युट्युब' आणि अशा अनेक प्रकारच्या समाजमाध्यमांनी पार बदलून टाकलेले आहे. एकूण प्रसार माध्यमांचा विस्तार, प्रभाव कमालीचा वाढलेला आहे. पण त्याचबरोबर या प्रसारमाध्यमांची विश्वसनीयता कधी नव्हे एवढी घटलेली आहे. अशा बिकट काळात सामाजिक बांधिलकी व समाजहितैषी सामाजिक मूल्यांची पुनःस्थापना होण्याची सार्वत्रिक गरज आहे असे जाणवते. अशा पार्श्वभूमीवर भारतीय प्रसारमाध्यमांचा आद्यपुरुष, आद्यपत्रकार देवर्षी नारद यांचे जयंती निमित्त पुण्यस्मरण सकल प्रसारमाध्यम क्षेत्रातील सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहे.
ऋषी परंपरेतील सकल जनसखा
देवर्षी नारद हे सर्वत्र संचार करणारे, पौराणिक काळातील देव, दानद आणि मानव अशा तिन्ही समाजघटकांशी संवाद साधून, संदेशवहन करणारे, एवढेच नव्हे तर सामाजिक हिताच्या दृष्टिने त्या समाजघटकात सौहार्द, सलोखा स्थापित करणारे प्रभावी, कुशल 'संज्ञापक' (कम्युनिकेटर) होते. त्यांची भूमिका व्यापकहितासाठी सुयोग्य ते घडवून आणण्याची म्हणजे आजच्या भाषेत संज्ञापकासह 'अॅक्टिव्हिरट' पत्रकारासारखीय सक्रिय होती. आधुनिक पत्रकारितेवे वैयक्तिक संचार, संवाद (Personal Communication) समूहसंचार-संवाद (Group Communication) आणि जनसमूहसंचार संवाद (Mass Communica-tion) असे सारे पैलू देवर्षी नारदांच्या ठायी होते. तसेच ते थोर चिंतक आणि ग्रंथलेखकही होते, त्यांची ग्रंथसंपदा हा भारतीय ज्ञानपरंपरेतील फार मोठा ठेवा आहे. त्या काळी 'कीर्तन' हे प्रबोधनाचे, समूहमन घडविण्याचे, सामाजिक मूल्य प्रसार व रक्षणाचे सर्वांत मोठे प्रभावी माध्यम होते आणि देवर्षी नारद हे जसे आद्य संज्ञापक आहेत तसे ते आद्य कीर्तनकार मानले जातात. 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।' ही राष्ट्रीय संत नामदेवांबी उक्ती नारदपरंपरेचीच नवी कालसापेक्ष आवृत्ती आहे.
'कीर्तन' है पौराणिक काळातील सर्वमान्य असे प्रसार माध्यम, संवाद माध्यम होते. आजच्या 'युट्यूब', 'व्हॉटसअॅप', 'एक्स' आदी समाजमाध्यमांएवढे प्रभावी, आणि सर्वजनसुलभ होते.
भारतीय संस्कृती ही अभ्युदय आणि निःश्रेयस या तत्त्याच्या अधिठानावर वर्धिष्णू झालेली आहे. 'ऋषी' आणि 'कृषी' हे भारतीय संस्कृतीचे जीवनाचे दोन मुख्य घटक आहेत. एक चिंतक ज्ञानयोगी आहे तर दुसरा सश्रम कार्य करणारा कर्मयोगी आहे. देवर्षी नारद हे ऋषी परंपरेतील एक अग्रणी चतुरस, संवादकुशल, समाजरांघटक अरो व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ठायीची गुणसंपदा आणि अंतरंग अधिकार यामुळे त्यांना 'देवर्षी' अशा गौरवपूर्ण विशेषणाने सकलांनी गौरवलेले आहे. ऋषी परंपरेतील वैचारिक परिपक्वता आणि सामर्थ्यांचे दर्शन नारदांच्या कार्यातून दिसते. देवर्षी नारद हे श्रीकृष्णांसह अनेक राजे, ऋषीमुनी यांचे जिवलग सल्लागार होते. तसेच ते व्यास महर्षी, वाल्मिकी ऋषी, बालतपस्वी ध्रुव, भक्त प्रल्हाद यांचे गुरू होते. एवढेच नव्हे तर दैत्यांचे, असूरांचे विश्वासू होते. ते अजातशत्रू होते. सकल लोकांशी 'मैत्र' हा त्यांच्या 'कुशल संदेशवाहक' व 'विश्वासू' मध्यस्तीपणाचे मुख्य सूत्र होते. थोडक्यात देवर्षी नारद हे उत्तम 'संदेशवाहक' 'कुशल संवादपटू' म्हणून देव, दैत्य, ऋषी, लोक अशा सकल समाज घटकांचे 'फ्रेंड गाईड आणि फिलॉसॉफर' होते. नव्या भाषेत सांगायचे तर त्यांचा 'पीआर' (पब्लिक रिलेशन) म्हणजे जनसंपर्क व संवाद व्यापक होता.
देवर्षी नारद विरचित 'नारद भक्ती सूत्रे' हा ग्रंथ मक्तीक्षेत्रातील दीपस्तंभ मानला जातो. तसेच 'नारद पाचरात्र', 'नारद स्मृती', आणि 'नारदपुराण' हे ग्रंथ देवर्षी नारदांच्या विलक्षण प्रज्ञाप्प्रतिभेची अक्षरलेणी आहे. या ग्रंथाचे ज्ञानमूल्य लक्षात घेऊन अनेक विदेशी विद्वानांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केलले आहे. ते अनेक विदेशी विद्यापीठात अभ्यासले जाते. भारतीय ज्ञान ठेपा आहे. त्यामुळे देवर्षी नारदांचे स्मरण हे 'आद्य संज्ञापक' म्हणून जेव्हढे अगत्याचे आहे, तेव्हढेब थोर 'सारस्वत', 'ग्रंथलेखक' म्हणूनही प्रेरणादायी आहे.
प्रियः सर्वस्य लोकसत्यभिनंदिततः । गुणैस्र्वरूपेतस्य कोन्यस्ति भुवि मानवः ।
महाभारताच्या शांतीपर्वामध्ये राजा युधिष्ठिर आचार्य भीष्म यांना विचारतो की, या विश्वामध्ये सर्वांना प्रिय, सर्वांना यंदनीय, सर्वगुणसंपन्न अशी व्यक्ती कोण आहे? तेव्हा भीष्माचार्य 'देवर्षी नारद' यांचे नाय सांगतात, यावरून देवर्षी नारदांबी थोरवी लक्षात येते. एवढेच नव्हे तर ते तत्त्वचिंतक, मर्मज्ञ संगीतकार, भक्तीशास्त्राचा भाष्यकार होते, त्यांचा यथार्थ परिचय करून न घेताच, उथळ नाटक-चित्रपट लेखकांनी त्यांना 'कळीया नारद' असे विनोदी पात्र म्हणून चित्रित केले. पोटार्थी कथाकारांनीही त्यात भर टाकली हे आपले बौद्धिक दिवाळपण करंटेपणच आहे, या उलट अनेक विदेशी विचारवंत चिंतकांनी इ.स. १९८० मध्ये अमेरिकेत 'नारद थिऑसॉफिकल सोसायटी' स्थापन केली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन मधील 'माऊंट नेनीअर नॅशलन पार्क' मधील धब्धब्याला 'नारद फॉल्स' नाव दिलेले आहे. गुगलगुरुच्या भक्तांनी Narada Falls लाईट जरूर पहावी आणि देवर्षी नारदांची थोरवी जाणून घ्यावी, त्यांच्या प्रज्ञाप्रतिभेला वंदन करावे. 'नारद जयंती' त्याचसाठी साजरी केली जाते.
विद्याधर ताठे
पराग बिल्डींग, तळमजला, पद्मरेखा सोसायटी,
सहवास बसस्टॉप जवळ, कर्वेनगर, पुणे ४११:०५२
मोबा.9881909775
ईमेल: vidyadhartathe@gmail.com