•  21 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

‘सेवा भवन’ प्रकल्पाला आवश्यक सहाय्य निश्चितपणे करू: महापौर

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
बातम्या  

‘सेवा भवन’ प्रकल्पाला आवश्यक सहाय्य निश्चितपणे करू: महापौर


पुणे:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ येथे चालवले जाणारे सेवेचे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, या प्रकल्पाला आवश्यक असणारे सर्व सहाय्य आम्ही नक्की करू, असे मनोगत महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले.

महापौर मंजुषा नागपुरे, महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ‘सेवा भवन’ प्रकल्पाला भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महापौर नागपुरे यांनी सेवा भवन प्रकल्पातील डायलिसिस सेंटरची (Dialysis Center) पाहणी केली आणि तेथील कामकाज समजून घेतले. तसेच, जनकल्याण समितीतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध सेवाकार्यांची माहितीही त्यांनी करून घेतली.

डॉ. राजन पंडित आणि डॉ. अजय उपाध्ये यांनी डायलिसिस सेंटरची सविस्तर माहिती महापौर आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर आणि ॲड. मिताली सावळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह राजन गोऱ्हे व सहकार्यवाह मुकुल पाटगावकर यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि जनकल्याण समिती तसेच संघाचे वाङ्मय भेट दिले. सेवा भवन प्रकल्पाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती बेलसरे आणि संघटनमंत्री पराग कंगले यांनी जनकल्याण समितीचे कार्य तसेच प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडली. याप्रसंगी संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि महानगर प्रचारक रोहित रिसबूड उपस्थित होते.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • सेवा भवन
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (169), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (86), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.