•  27 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

हिंदू साम्राज्याचा सोहळा : शिवराज्याभिषेक

सुनील देशपांडे (sunil deshpande) 24 days ago
दिन विशेष   व्यक्तिविशेष  

शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा हिंदू साम्राज्य उत्सवच आहे.  म्हणूनच  त्या दिवशी समस्त भारतीय समाजात एक चैतन्य लहर निर्माण होते. हे कसे? याचा आणखी  एक पैलू या ठिकाणी उलगडून पाहूया. शिवराज्याभिषेकाच्या आधीही शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चालूच होता आणि तो प्रामुख्याने फारसी शद्बांवर चालत होता. पण राज्याभिषेकानिमित्ताने राज्याचे व राजाचे सार्वभौमत्व, वैशिष्ट्य, स्वत्वाची ओळख हे सर्वच लक्षात येते. त्यामुळे शिवराज्याभिषेक या सोहळ्याची अखिल भारतीय ओळख होते व त्या दिवसाचे महानपण जाणवते.

राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांनी नवीन राज्य व्यवहार कोष तयार करून घेतला. पण एवढेच याचे महत्त्व नाही, तर हा राज्य व्यवहार कोष संस्कृत भाषेत आहे. जर शिवाजी महाराजांच्या मनात हे मराठी राज्य असते, तर हा कोष तत्कालीन मराठीतही बनू शकला असता. पण तसे घडायचे नव्हते.

हा कोष बनवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांच्यावर सोपवली व त्यांनी ती जबाबदारी धुंडीराज म्हणून विद्वानांच्या मदतीने पूर्ण केली. १३८० फारसी, उर्दू शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द दिलेला बृहद् ग्रंथ अस्तित्वात आला.

संस्कृत भाषेची अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे स्वतंत्र भारतात सुध्दा राष्ट्रीय एकात्मतेसाठी किती अडचणी येत आहेत ते आपण पहातो. त्याकाळी सकळ राष्ट्र एकात्म करणारी संस्कृत भाषा ही कोषाची भाषा ठरली. त्यातूनच शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय अस्मितेच्या प्रकटीकरणाचा सोहळा आहे हे निश्चित झाले व संपूर्ण देश मोहरून गेला.

या प्रत्येक वैशिष्ट्याने हे सिद्ध केले की, एक सामान्य राज्याभिषेक नाही, तर राष्ट्र अस्मिता जागरणाचा हा  सोहळा आहे. म्हणून त्याचे ३५० वे स्मरण संपूर्ण देशाला आवश्यक व गरजेचे आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे हे समजणे गरजेचे आहे.                                                                                      

 


- सुनील देशपांडे (sunil deshpande)

  • Hindu Samarahya diwas
  • Shivaji Maharaj
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

सुनील देशपांडे (sunil deshpande)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक 

लौकिक शिक्षण: B.Com, LLB.

व्यवसायातून निवृत्त.

संघ प्रचारक म्हणून सामाजिक अनुभव व वाचन या आधाराने स्वान्त: सुखाय हेतूने लेखन. राष्ट्रीय दृष्टिकोनातून अनुभवसिद्ध लिखाण.

 इतिहास (9), हिंदुत्व (7), सामाजिक (2), राजकारण (1), माध्यमे (1), रा. स्व. संघ आणि परिवार (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.