पुणे ः प्रथितयश प्रकाशिका कै.सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रतित्यर्थ दिला जाणारा स्नेहांजली पुरस्कार यंदा प्राचार्य श्याम भुर्के यांना जाहीर झाला आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
शनिवारी (ता.5) सायंकाळी सहा वाजता एस.एम.जोशी सभागृहात मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं.देगलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्या येणार आहे. तसेच यानिमित्ताने आशुतोष बापट लिखित 'सफर नेपाळ'ची व अभिजित केतकर लिखित 'कथा वेरूळच्या कैलास निर्मितीटची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला डॉ . मुकुंद दातार, प्र.के.घाणेकर, अभय भावे आणि स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित असणार आहे. प्राचार्य भुर्के प्रथितयश लेखक असून, आत्तापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 15 हून अधिक नाटकांत काम केले आहे. स्नेहांजली पुरस्काराने आजवर प्रसिद्ध लेखक शेषराव मोरे, डॉ. वि.रा.करन्दीकर, डॉ. भीमराव गस्ती, डॉ. गो.बं.देगलुरकर, गिरीश प्रभुणे आणि डॉ. सदानंद मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहेत.
yenar aahe. sapatnik.
arvind dixit
03 Oct 2024 00:17