
कल्याण आश्रम, पुणे जिल्हा संघटक अरुण काथे यांना सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा सावित्रीबाई वावीकर स्मृती पुरस्कार जाहीर !!
सार्वजनिक वाचनालय,नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कै.सावित्रीबाई वावीकर स्मृती पुरस्कार यावर्षी कल्याण आश्रम पुणे जिल्हा संघटक श्री.अरुण काथे यांना जाहीर झाला आहे.
श्री.अरुण काथे हे घोडेगाव,ता.आंबेगाव, जि.पुणे येथे वास्तव्यास आहेत.व्यवसायाने शेतकरी असलेल्या श्री. काथे यांनी कल्याण आश्रमाच्या अनेक कामात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.आंबेगाव तालुका गटप्रमुख ( 2014 ) ते पुणे जिल्हा संघटनमंत्री ( 2024) असा त्यांचा प्रवास आहे.याशिवाय पिंपरगणे ग्रामपंचायत उपसरपंच, आघाणे गाव वनहक्क समिती - सचिव, वनधन समिती प्रकल्प स्तरीय समिती सदस्य,आंबेगाव तालुका माहिती अधिकार महासंघ प्रचार प्रसार प्रमुख, प्रधानमंत्री वनधन विकास केंद्र मावळ - अध्यक्ष,पेसा कोष समिती व वन संरक्षण समिती आघाणे यांचे ते अध्यक्ष आहेत.त्यांनी अनेक सामाजिक कामे तडीस नेली आहेत.ज्यात प्रामुख्याने पाच वनधन विकास केंद्र मंजुरी त्यातील तीन केंद्रांना चोवीस लाख मंजूर करणे आणि आदिम समाजाला अनेक सोयी उपलब्ध करवून देणे अशी काही कामे आहेत . माहिती अधिकार कायद्यांचे प्रशिक्षणही घेतले आहे.या कायद्यासंबंधीचे मार्गदर्शनही ते करतात.
अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला हा मानाचा पुरस्कार मिळणे म्हणजे जनजाती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा गौरव करण्यासारखे आहे.ह्या पुरस्काराबद्दल श्री.अरुण काथे यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!