•  06 Oct 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

स्वतःपासून कृतियुक्त पर्यावरण रक्षण करणाऱ्या श्वेताताई

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 3 days ago
भाष्य  

  उपासना नारीशक्तीची 

  स्वतःपासून कृतियुक्त पर्यावरण रक्षण करणाऱ्या श्वेताताई 


   “थेंब थेंब पाण्याचा फुलवितो अंकुर जीवनाचा,”  हेआपण  सर्व ऐकत असतो. “पाणी” या विषयात काम करत आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या, निसर्गाशी, पर्यावरणाशी आत्मीय नाळ जुळवणाऱ्या श्वेताताई पटवर्धन यांची वाटचाल सर्वांना प्रेरणादायी आहे.
   आपल्या छोट्या कृतीतून समाजात बदल घडवून आणण्यासाठी  त्या प्रयत्नरत असतात. त्या पुण्यातील विद्यापीठ भागातील पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या  “पाणी” विभाग प्रमुख आहेत. 
उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे लहानपण घालवलेल्या श्वेताताई पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व जाणून होत्या. प्रचंड ऊन, आणि पाण्याचा दुष्काळ असलेल्या धुळ्यात उन्हाळ्यात आठ––पंधरा दिवसांनी पाणी येत असे. “एकदा तर २१ दिवसांनी पाणी आले होते,” हे आठवल्याने  महाराष्ट्रातीलच काही भागात पाण्याच्या थेंबांसाठी किती वणवण करावी लागते हे सांगताना त्यांचे डोळे पाणवले. 
   शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या श्वेताला पुण्यात  दिवसभर नळांना वाहणारे  पाणी पाहून पुणेकरांचा हेवा वाटत असे. पुण्यात शिक्षण घेतलेल्या श्वेता ताई 1999 मध्ये लग्न होऊन पुण्यात कायमच्या स्थायीक झाल्या. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने आपोआपच लहानपणापासूनच पाणी वाया न घालवण्याची सवय अंगी रुजली. त्यामुळेच “पाणी” विषयात त्यांनी मनापासून काम करायला सुरूवात केली. कुठलंही पाणी, अन्न वाया जाऊ द्यायचं नाही,  कोणत्याही गोष्टीचा अपव्यय होता कामा नये हे  आईने  केलेला संस्कार त्या कधीही विसारल्या नाहीत. 
   घरातील ओला कचरा परस दारातील अंगणात खड्डा खणून  त्यापासून कंपोस्ट खत तयार करताना त्यांनी आपल्या आईला पाहिले होते. तीच शिकवण अंगिकारत त्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास सुरूवात केली. ती छोट्याशा  घरात जमा होणारे  प्रत्येक प्लास्टीक वेगळे करून संकलित करण्यास त्यांनी प्रारंभ केला.
मोठ्या प्रमाणात कचऱ्यात जाणारे प्लॅस्टिक अनेक जीवांना व  निसर्गाला ही  घातक ठरत आहे. प्लॅस्टिकचे विलगीकरण करणे आवश्यक आहे, यासाठी  जनजागृतीची आवश्यकता असल्याचे लक्षात येत त्यांनी त्या कामात  स्वत:ला झोकून घेतले. 
   गेली बारा वर्षे, त्यांच्या घरातून एकही प्लास्टिक कचरा सरळ कचराकुंडीत गेला नाही. सुक्या कचऱ्या शेजारी प्लॅस्टिकसाठी स्वतंत्र पिशवी त्या ठेवतात व प्लास्टीक कचऱ्यांतून वेगळे करतात.  महिनाभरात संकलित झालेले प्लॅस्टिक पूर्णंम ईको व्हीजन या संस्थेमार्फत रिसायकलिंगसाठी दिले जाते. त्यांच्या सोसायटीतील अनेक  कुटुंबही ही पद्धत अंगीकारत प्लास्टीक विलगीकरण करत  पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत हातभार लावत आहेत.
प्लॅस्टिक विलगीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी छोट्याछोट्या उपक्रमातून, रस्ते , सोसायटी, चौक या ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करत त्या जनजागृती करीत आहेत. ओला कचरा सुका कचरा वेगळा करत ओला कचऱ्यांपासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी, स्वत: पुढाकार घेऊन आपण राहत असलेल्या सोसायटीत कंपोस्ट प्लान्ट त्यांनी  उभा केला.  त्याचे संपूर्ण व्यवस्थापन गेली अनेक वर्ष त्या स्वत: करीत आहेत. 
   रसायनमुक्त जीवनशैलीचा वापर करत घरगुती पातळीवर ही  श्वेताने स्वतःचे बायो एंझाइम बनवायला सुरुवात केली. ज्यामुळे रसायनाचा वापर असलेले फ्लोअर क्लीनर खरेदी करणे थांबले. त्या अभिमानाने सांगतात,“आमच्या घरात आता घातक रसायनांचा शून्य वापर होतो; निसर्गाने आपल्याला दिलेली संपत्ती संरक्षित केली जाते.”आपल्या दैनंदिन जीवनातून रसायन दूर करून रसायनमुक्त जीवनशैली अंगिकारणेसाठी कार्यशाळा ही त्या घेतात. 
सणवारांना  त्यांनी पर्यावरणाचा रंग देत “पर्यावरण पूरक उत्सव” साजरा करणे साठी प्रयत्न केले. सोसायटीत झालेल्या गणेश उत्सवात “शून्य कचरा”  संकल्पना मांडत  निसर्गातील वस्तु दगड, माती, विटा वापरुन सजावट करत त्यावर मोहरी, धने, हळीवचे  बीजारोपण करत गणपतीचे डेकोरेशनसाठी प्रवृत्त करत सर्जनशील संकल्पना मांडली गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान लहान मुलांना घरात जमा होणारे प्लास्टिक गोळा करण्याचा उपक्रम देऊन लहान मुलांच्या मनात पर्यावरण प्रेम जागृत केले. सोसायटीत होणाऱ्या सामूहिक कार्यक्रमात कचरा होऊ नये म्हणून भोजनास येताना स्वत:ची ताट  वाटी भांड चमचा जवळ बाळगण्यासाठी  प्रयत्न पूर्वक  प्रयत्न करतात. 
फक्त घरापुरतेच नव्हे, तर समाजातही त्यांनी प्रयत्नांची साखळी रचली. पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनसोबत दहा वर्षांपासून ई-वेस्ट, प्लास्टिक आणि कपड्यांचे संकलन ड्राईव्ह त्यांच्या पुढाकारातून आयोजित केला जातो. या संकलनात जमा करण्यात आलेल्या साहित्याचे योग्य पद्धतीने, निसर्गाला हानी न पोहचवता  रीसायकालिंग केले जाते. 
   पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या  माध्यमातून आयोजित केलेल्या “ईक्षणा” म्हणजेच पर्यावरणकडे पाहण्याचा दृष्टिकोन या भरतनाट्यम कार्यक्रमाचे  सादरीकरणातून  भारतातील पुणे, बंगलोर, चेन्नई, दिल्ली सारख्या मोठ्या  शहरांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात मोलाचे योगदान श्वेता ताईनी दिले आहे. 
   महाकुंभ पर्यावरणपूरक व्हावा यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या माध्यमातून ‘एक थाली, एक थैला’ अभियान  राबविण्यात आले होते या अभियानात त्यापश्चिम महाराष्ट्र समन्वयक  होत्या. या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातून  ५७६९०  थाली व  १११७३० थैली” महाकुंभ स्थानी पोहोचले  त्यामुळे कचरा कमी होण्यास  मदत झाली. 
आपण केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न निसर्गासाठी मोठा ठरतो. आपण अंगिकारलेली छोटी सवय मोठा बदल घडवून आणू शकते  हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे. 

 लेखक - अपर्णा पाटील


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • पर्यावरण
  • महाकुंभ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (118), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (7), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (3), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.