•  11 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

छत्रपती संभाजी महाराज यांचा अग्निदिव्य जिवन प्रवास सांगणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरी "छावा" आता घरपोच मिळवा.

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 15 days ago
बातम्या  

छत्रपती संभाजी महाराज यांचा अग्निदिव्य जिवन प्रवास सांगणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरी "छावा" आता घरपोच मिळवा.

मूळ किं. ७५०+५० टपाल = ८०० रू.

सवलत मुल्य ६७५+५० = ७२५ रू. घरपोच

संपर्क : 8999192654

‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।

लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।

ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।

त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’

कादंबरी ची सुरुवात शंभु राजांच्या जन्मापासून सुरु होते त्यामुळे जरी पुस्तक संभाजी राजांवर असले तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास हि संक्षिप्त रुपात लेखकाने यात दिला आहे.

१४ मे १६५६ ला शंभु राजांचा जन्म होतो आणि तिथूनच त्यांचा अग्निदिव्य प्रवास सुरु होतो, आई सईबाई  बाळंत व्याधीने त्रस्त होतात आणि शंभूराजांना आईचे दुधहि मिळत नाही. ऐन स्वराज्याचा विस्तार होत असताना आणि शंभुराजे तीन वर्षाचे असतानाच सईबाई सोडून जातात. नंतर एकमेव जिजाऊ मासाहेबच शंभु राजांचा आधार होतात,अवघे नऊ वर्षाचे होताच पुरंदरच्या तहाने त्यांना मुघल मनसबदार म्हणून राजा जयसिंगकडे राहावे लागते, आग्र्यात वडिलांसोबत औरंगझेब ला भेटायला गेल्यानंतर झालेला वडिलांचा अपमान, त्यानंतर झालेली कैद, तेथून सुटका झाल्यावरही अनेक दिवस एकटेच मथुरेत राहावे लागते, वडिलांसमोर अपराधी म्हणून भर सभेत उभे व्हावे लागले. अश्या सर्व प्रसंगच्या ठिकाणीच लेखक आपल्याला घेऊन जातात आणि प्रत्यक्ष घटना डोळ्यासमोर घडत असल्याचा भास वाचताना जाणवतो.

महाराजांच्या अंतिम वेळीही आप्तांकडून शंभूराजांच्या विरोधात चालू असलेले कट ते गेल्यानंतरही त्यांच्या अटकेसाठी मांडलेला डाव हे प्रसंग वेदानात्मक आहेत. याच वेळी पहिल्यांदा दिल्हीतून तीस लाखांचं सैन्य,चौदा कोटीचा खजिना घेऊन अवाढव्य अजगर औरंग्या शंभुराजांसह संपूर्ण दख्खन गिळायला स्वराज्यात पाय ठेवतो, अश्या बलाढ्य अजगरालाही ९ वर्षे दक्षिणेतच संभाजी राजे नाचवतात, अखेर शंभुराजांच्या शौर्याला संतापून कुटनीतीने त्यांना संपवण्याचा कट झाला, आप्तांच्या फितुरीने  शंभूराजे आणि कवीकुलेश अजगराच्या तोंडात आप्तांकडूनच दिले जातात, हि गोष्ट मनाला फार सलते, धर्मांतराचा पर्याय असूनही तो न स्वीकारता धर्मासाठी वेदानात्मक अश्या मृत्यूची निवड करतात परंतु त्या औरंग्यासमोर हा छावा झुकत नाही, त्यामुळेच आज ते धर्मरक्षक संभाजी म्हणून संबोधले जातात. शेवटी त्यांच्यावर झालेले अत्याचार वाचवत नाहीत.

शस्त्र आणि शास्त्र दोनीही गोष्टीत निपुण असणारा राजा क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो. वयाच्या १३ व्या वर्षी १३ भाषा अवगत असलेला पंडित, याच वयात संस्कृत मधून "बुद्धभूषण" हे काव्य रचून कवी म्हणून सिद्धता मिळवली आणि तसाच अटीतटीचा प्रसंग आलाच तर हा मराठी कवि मनाचा राजा एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यालें की मृत्यूलाही कसे धडक समोर जाऊ शकतो हे दाखवून देणारा, अश्या या शंभुराजांचा अग्निदिव्य जीवनप्रवास प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे असं मला वाटते.

"खरे तर छत्रपती संभाजी महाराज हे ओळखे जावे त्यांच्या बलिदानासाठी "

भारतीय विचार साधना फाऊंडेशन, पुणे


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • कादंबरी
  • छावा
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.