ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सची 17 डिसेंबर 1927 रोजी क्रांतिकारक भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांनी वध केला. लाला लचपतराय यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या या ब्रिटिश अधिकाऱ्याला क्रांतिकारकांनी यमसदनी धा़ले. दोन्ही कार्तिकाराक फरार होऊन लाहोरमधून बाहेर निसटले. राजगुरू नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार यांना भेटले. या मागचे नक्की कारण काय होते, राजगुरूंचा संघाशी काय संबंध होता, याचाच धांडोळा घेणारी हे ऐतिहासिक संदर्भ....
संदर्भ- ना. ह. पालकर लिखित डॉ. हेडगेवार, पृ. क्र. २२२
“प. पू. डॉक्टर हेडगेवार १९२८ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाहून परत आल्यावर थोड्या दिवसांनी लाहोरच्या सॉंडर्स या इंग्रज अधिकाऱ्याला कंठस्नान घातलेले श्री. राजगुरू भूमिगत स्थितीत नागपुरास आले. त्यांची व डॉक्टरांची बरीच ओळख होती. एक-दोन वर्षांपूर्वी राजगुरू हे नागपूरच्या भोसला वेदशाळेत राहून वेदाध्ययन व भिक्षुकी करीत असता मोहिते वाड्यातील संघशाखेवर येत असत व त्यामुळे त्यांचा व डॉक्टरांचा चांगलाच परिचय होता. एवढेच नव्हे, तर श्री. भाऊजी कावरे विद्यमान असताना एकदा सरदार भगतसिंह हे त्यांना व प. पू. डॉक्टरांना भेटून गेल्याचे श्री. नारायणराव देशपांडे (आर्वी) व श्री. व्यंकट नारायण सुखदेव (नागपूर) अशा काही जणांना निश्चित आठवते. हि त्यावेळी डॉक्टरांशी झालेली भेट वर्ध्याचे श्री. गंगाप्रसाद पांडे यांच्या ओळखीने घडली होती.”
“श्री. राजगुरू नागपूरला येण्यापूर्वी कलकत्ता काँग्रेसच्या वेळी श्री. बाबाराव सावरकर व डॉक्टर यांना तेथे भेटले असण्याचीही शक्यता वाटते. १९२९ च्या प्रारंभी राजगुरू नागपूरला आल्यावर त्यांची व्यवस्था करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात प. पू. डॉक्टरही होते. एवढेच नव्हे तर, भूमिगत असताना राजगुरूंनी पुणे भागात जाऊ नये, असा आग्रह डॉक्टरांनी केला व त्यांची उमरेडचे श्री. दाणी यांच्या दूरच्या एका शेतावर राहण्याची व्यवस्था करण्याचे योजले. पण, अशी योजना चालू असताना राजगुरूंनी डॉक्टरांचा आग्रह डावलून नागपूर सोडले व पुढे ते पुण्याला गेल्यावर थोड्याच दिवसांत पकडले गेले.”
संदर्भ - ना. ह. पालकर लिखित डॉ. हेडगेवार, पृ. क्र. २७०
“डॉक्टर हेडगेवार यांचा भगतसिंह व राजगुरू यांच्याशी परिचय होता; इतकेच नव्हे, तर नागपुरातील वास्तव्यामुळे राजगुरूंशी त्यांचे निकटचे संबंध आले होते. असे तेजस्वी तरुण फासावर चढण्यापूर्वी ज्या दुर्दमणीय विश्वासाने व उसळत्या तारुण्याने रसरसून मेरा रंग दे बसंती चोला। इसी रंग में रंग के शिवा ने माँ का बंधन खोला, असे गीत मुक्तकंठाने घुमवीत होते. त्याच मनःस्थितीत व त्याच रंगात रंगलेल्या डॉक्टरांनी मातृभूमीच्या विमोचनासाठी अशा जागृत तरुणांची देशव्यापी फळी उभी करण्यासाठी अधिक धडपड करण्याचा निश्चय करून तो आघात सहन केला
होता.”
संदर्भ - नरेंद्र सेहगल यांचे पुस्तक भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या हिंदी पुस्तकाधील एका उताऱ्याचा भावानुवाद, पृ. क्र. १४६ -१४७ :
“लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी सरदार भगतसिंह आणि राजगुरू यांनी लाठीमार करणारा पोलीस अधिकारी सॉंडर्सवर लाहोरमधील मालरोड येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केले. दोन्ही कार्तिकाराक फरार होऊन लाहोरमधून बाहेर निसटले. राजगुरू नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार यांना भेटले. राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहितेवडा शाखेचे स्वयंसेवक होते. नागपूरचे एक हायस्कूल असलेल्या भोसले वेधशाळेचे विद्यार्थी असल्यामुळे राजगुरूंनी डॉ. हेडगेवार यांच्याशी घनिष्ठ ओळख होती. म्हणून, डॉक्टरांनी आपले एक सहकारी कार्यकर्ते भैयाजी दाणी यांच्या फार्महाऊसमध्ये राजगुरू यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली. राजगुरूंना सांगण्यात आले की, त्यांनी आपल्या गावी पुणे येथे कदापि जाऊ नये; कारण त्यांना तेथे गेल्यास अटक होण्याचा अत्यंत धोका आहे.”
“या इशाऱ्याकडे राजगुरूंनी दुर्लक्ष केले व पुण्याला आपल्या घरी गेले. डॉक्टरांची शंका खरी ठरली. राजगुरूंना अटक झाली, त्यांच्यावर अभियोग चालला. सरदार भगतसिंह व सुखदेव यांच्यासह त्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली, तिघांनाही फाशी देण्यात आले. या हौतात्म्यामुळे डॉक्टरांना दुःख झाले परंतु याचे आश्चर्य वाटले नाही. आपल्या सहकाऱ्यांना ते एवढे मात्र नक्कीच म्हटले की, हे बलिदान वाया जाणार नाही.”
---
समाप्त