देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण केवळ एकाच उपायात आहे - छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र - गोविंद गिरी महाराज

पंढरपूर प्रतिनिधी -पंढरपूर येथील आरती मंडप येथे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी श्री गोविंद गिरी महाराज यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. श्री गोविंद गिरी महाराज म्हणाले
रामायण व महाभारत दोन्ही एक करा, सर्व सद्गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपति शिवराय आहेत. शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक हा हिंदुस्थानच्या इतिहासातला सर्वोच्च क्षण असल्याचे मत या कार्यक्रमात महाराजांनी व्यक्त केले. सद्य परिस्थितीत देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ शिवछत्रपतींचे चरित्र हाच एकमेव पर्याय असल्याचे परखड मत यावेळी महाराजांनी व्यक्त केले. सद्य परिस्थितीत हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यांचा विचार करून १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन ही यावेळी केले. वयाच्या सोळव्या वर्षापासून भागवत कथा सांगितली परंतु नुकत्याच बांगलादेश येथील हिंदूंच्या वर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्भूमीवर आपण समाजामध्ये शिवचैतन्य जागृत करण्यासाठी काम करणार असल्याचे मत श्री गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केले. सद्य परिस्थितीत सर्व हिंदू संतांनी हिंदू धर्मावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे मतही महाराजांनी यावेळी व्यक्त केले