•  18 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा शनिवारी समारोप

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 15 days ago
बातम्या  

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा शनिवारी समारोप

भय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन; शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु शेखर यांची प्रमुख उपस्थिती
पुणे, दि. १ जुलै २०२६ :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'संघ शिक्षा वर्गा'चा प्रकट समारोप शनिवारी (दि. ४ जुलै) सायंकाळी ठीक सहा वाजता शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेच्या मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमात संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून, तर ‘एचईएमआरएल’चे समूह संचालक व शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु शेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या स्वयंसेवकांसाठी या १५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि वर्गाचे सर्वाधिकारी दत्तात्रय गर्गे यांनी दिली. शनिवारच्या मुख्य कार्यक्रमात स्वयंसेवकांद्वारे विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले जाणार असून, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

 १९ जून रोजी सुरू झालेल्या या वर्गाचे उद्घाटन प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते झाले होते. या प्रशिक्षणात एकूण ७५ शिक्षार्थी (स्वयंसेवक) सहभागी झाले होते. वर्ग कालावधीत शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी, देशभक्ती व समाजसेवा दृढ करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी पाऊस आल्यास, हा प्रकट समारोप सोहळा रमणबाग मैदानाऐवजी 'केसरीवाडा' येथील लोकमान्य सभागृहात पार पडेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • संघ शिक्षा वर्ग
  • प्रमुख मार्गदर्शक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (195), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (70), रा. स्व. संघ आणि परिवार (88), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.