•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

'भारतीयत्व रुजवणे' प्रसार माध्यमांसाठी महत्त्वाचे - प्रा. संजय तांबट

विश्व संवाद केंद्र - पुणे 16 days ago
बातम्या  

'भारतीयत्व रुजवणे' प्रसार माध्यमांसाठी महत्त्वाचे - प्रा. संजय तांबट
पंढरपूरात माध्यम संवाद परिषदेचे आयोजन 

पंढरपूर: "भारतीयत्व ही संकल्पना समाजात दृढ झाली, तर राष्ट्रीय सुरक्षा आपोआप निर्माण होईल. यासाठी प्रसार माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी," असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनी व्यक्त केले. शेजारच्या देशातील राजकीय अस्थिरता पाहता, शब्दांचा शस्त्राप्रमाणे कसा वापर होतो हे लक्षात घेऊन माध्यमांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न जनतेसमोर आणणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

विश्व संवाद केंद्र, पुणे आणि विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर येथे झालेल्या माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वेरीचे सचिव डॉ. बी. पी. रोंगे, अरिहंत पब्लिक स्कूलचे सचिव उज्वलभई दोशी, कार्यशाळा मार्गदर्शिका प्रांजली देशपांडे आणि माध्यम संवादचे नरेंद्र जोशी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या परिषदेत झालेल्या 'एआय (AI) कार्यशाळेत' प्रांजली देशपांडे यांनी पत्रिकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर कसा करावा, त्याचे फायदे-तोटे, शक्यता आणि विश्वासार्हता यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या माध्यम परिषद व कार्यशाळेसाठी पंढरपूरसह माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यांतील बातमीदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत ॲड. महेश वाळुजकर, परिचय डॉ. सचिन लादे, प्रास्ताविक नरेंद्र जोशी, सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले, तर आभार स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • माध्यम परिषद
  • संवाद
  • भारतीयत्व
  • तांबट
  • विश्व संवाद केंद्र
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.