•  22 Sep 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

बाबाराव पुराणिक: प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेला निष्ठावंत कर्मयोगी

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
भाष्य  

बाबाराव पुराणिक: प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेला निष्ठावंत कर्मयोगी

प्रसिद्धी, मान-सन्मान आणि सत्काराच्या मागे धावणाऱ्या आजच्या काळात, स्वतःचाच नागरी सत्कार "सत्काराने अहंकार जागा होतो आणि तो पतनाला कारणीभूत ठरतो," असे ठामपणे सांगून नाकारणारे व्यक्तिमत्त्व दुर्मिळच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक अ‍ॅड. अनंत वासुदेव ऊर्फ बाबाराव पुराणिक हे अशाच दुर्मिळ आणि निष्ठावंत कर्मयोग्यांपैकी एक होते. २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा.

बाबाराव पुराणिक यांचा जन्म २२ सप्टेंबर १९३१ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणी या गावी एका मध्यमवर्गीय पुरोहित कुटुंबात झाला. पिता वासुदेव आणि माता यमुनाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या १४ अपत्यांपैकी बाबाराव एक होते. घरातील अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत बाबारावांवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा आणि शिस्तीचा मोठा प्रभाव पडला. लहानपणी अभ्यासात थोडे चंचल असलेले बाबाराव इयत्ता सहावीत गणितात अनुत्तीर्ण झाले होते. मात्र, आईने दाखवलेल्या कठोर शिस्तीमुळे आणि मायेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पुढे त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बी.कॉम आणि प्रथम श्रेणीत एम.कॉम पूर्ण केले. दहावीत असताना शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी पुस्तकांच्या दुकानात काम केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यवतमाळ येथे प्राध्यापक म्हणून काही काळ काम केले.

- प्राध्यापकाची नोकरी सोडून संघकार्याला वाहून घेतले
बालपणीच वर्ध्यातील शाखेत स्वयंसेवक बनलेल्या बाबारावांवर डॉ. हेडगेवार यांचे सहकारी अप्पाजी जोशी यांचा मोठा प्रभाव होता. अप्पाजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वर्ध्यात ६ नव्या शाखा सुरू केल्या. पुढे अप्पाजींच्याच प्रेरणेने १९६४ मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून पूर्णवेळ संघ प्रचारकाचे व्रत स्वीकारले. केशवराव गोरे आणि मोरोपंत पिंगळे यांच्यासारख्या धुरिणांच्या सहवासात त्यांच्या संघकार्याला अधिक गती मिळाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी विदर्भ, बिलासपूर, दक्षिण बिहार, उत्तर बिहार आणि बिहार क्षेत्र प्रमुख म्हणून संघकार्याचा मोठा विस्तार केला.

- आणीबाणी आणि बंदीच्या काळातही अविरत कार्य
१९४८ मध्ये संघावर बंदी आली, तेव्हा बाबाराव नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते; मात्र तेथेही त्यांनी गुप्तपणे आपले उपक्रम सुरू ठेवले होते. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले होते. एका गुप्तचर अधिकाऱ्याने त्यांना ओळखून पकडलेसुद्धा; परंतु त्यांच्या निस्पृह आणि पवित्र कार्यापुढे नतमस्तक होत "तुम्ही खूप चांगले काम करत आहात, सावध राहा," असे सांगत त्या अधिकाऱ्याने त्यांना सोडून दिले होते.

बाबाराव अत्यंत मितव्ययी आणि कडक शिस्तीचे होते. रोज पहाटे ४ वाजता उठून कठोर व्यायाम करणे आणि स्नान करूनच शाखेत जाणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांचा आवाज अत्यंत बुलंद आणि गळा गोड होता. संघाच्या कार्यक्रमांत ते जेव्हा 'ऋषि मुनि राजा प्रजा सभी ने, इस पर तन-मन वारा...' हे गीत गात, तेव्हा उपस्थित भावविभोर होत असत. त्यांनी अनेक संघगीतांना चालीही लावल्या होत्या.

आयुष्याच्या उत्तरार्धात ते छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे वास्तव्यास होते. २०१४ मध्ये तेथील स्वयंसेवकांनी बाबारावांना न कळवता त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. मात्र, कार्यक्रमास निघताना जेव्हा त्यांना ही बाब कळली, तेव्हा त्यांनी सत्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. "सन्मानाने अहंकार वाढतो," या आपल्या तत्त्वावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.

१० जून २०१५ रोजी राजनंदगाव येथे या निरहंकारी राष्ट्रसेवकाचे निधन झाले. कडक शिस्त, उज्वल राष्ट्रभक्ती आणि निरहंकारितेचा वारसा सोडणारे बाबाराव पुराणिक यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

(संदर्भ : महेश पुराणिक, राजनंदगाव / वीरेंद्र जी, दिल्ली)


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • प्रसिद्धी
  • मान-सन्मान
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (223), कला (3), संस्कृती (46), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (70), रा. स्व. संघ आणि परिवार (89), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (12), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.