•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सामाजिक न्याय परिषद यंदा नागपुरात

विश्व संवाद केंद्र - पुणे 4 days ago
बातम्या  

सामाजिक न्याय परिषद यंदा नागपुरात

नागपूर, दिनांक २६ जून २०२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व ‘सामाजिक न्याय’ दिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संदर्भात आज नागपूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी विवेक विचार मंच चे राज्य संयोजक श्री सागर शिंदे, न्याय परिषद स्वागत समिती सचिव श्री संदीप जाधव, श्री सुनीलजी किटकरू, श्री.मनीष मेश्राम व श्री अतुल शेंडे उपस्थित होते.

विवेक विचार मंच महाराष्ट्रात भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक न्यायाच्या तत्वाने सक्रीय असून वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत आहे. भारतीय संविधान व विविध वैचारिक विषयात लोकजागृती करून संविधानिक मुल्यांची रुजवणूक व सामाजिक बंधुभाव जोपासला जावा या उद्देशाने कार्य करत आहे. विशेषतः राज्यात जातीय अन्याय, अत्याचार व सामाजिक तणावाच्या घटना तसेच समस्यांमध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून मंच सक्रीय आहे. विवेक विचार मंच व सहयोगी संस्थांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व ‘सामाजिक न्याय’ दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. यानिमित्ताने राज्यातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, संवाद साधावा आणि सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने आवश्यक सामाजिक कार्य आणखी गतीने व्हावे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले जाते तसेच सामाजिक न्याय व समतेच्या विषयात कार्य करणाऱ्या संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने विवेक विचार मंचाच्या वतीने राज्यातील दहा संस्था किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना "छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार" सन्मानाने प्रदान केले जातात.

यावर्षीची सामाजिक न्याय परिषद नागपूर शहरात संपन्न होणार असून या परिषदेला खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मा.श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

मा.श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग)

पद्मश्री नामदेव कांबळे (सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक)

मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे (मा.मंत्री, महसूल, महाराष्ट्र)

मा.श्री.संजय शिरसाठ (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र)

श्रीमती डॉ.माधवी खोडे चवरे (मा.कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)

मा.श्री. सुनील वारे (महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था - BARTI)

मा.डॉ.सुभाष कोंडावार (मा.प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)

मा.श्री.प्रदीप रावत (अध्यक्ष - विवेक विचार मंच, महाराष्ट्र, माजी खासदार पुणे)

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२५ :-

सन्माननीय पुरस्कारार्थी

- कोकण विभाग

१. श्रीमती. डॉ .रेखाताई गोपालसिंह बहनवाल, ठाणे

२. श्री. अॅड.संदिप दादा जाधव, मुंबई

- पश्चिम महाराष्ट्र विभाग

१. श्री. राजेंद्र सोनुबाई दामोदर गायकवाड, दिंडोरी, नाशिक.

२. श्री. चंद्रकांत भानुदास काळोखे, अहिल्यानगर.

- मराठवाडा – खान्देश विभाग

१. श्री.आनंद माणिकराव लोखंडे, छत्रपती संभाजीनगर.

२. श्री. विकास वामन अवसरमल, रावेर जळगाव.

- विदर्भ विभाग

१. श्री. नागेश श्रावण पाटील, वसुधंरा परिवार, नागपूर

२. श्री. प्रताप फक्कुजी निंदाने, खामगाव, बुलढाणा

३. श्रीमती. रेखाताई मधुकर कांबळे, (अस्मिता मागासवर्गीय बहुउद्देशीय विकास व संशोधन संस्था, अकोला)

४. सेवा सर्वदा बहुद्देशीय संस्था, नागपुर

 

सामाजिक न्याय परिषदेला राज्यभरातून सामाजिक संस्था संघटनांचे सुमारे १२०० प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत. दिवसभराच्या परिषदेत तीन प्रमुख सत्र होणार आहेत. पहिले उद्घाटन सत्र असेल ज्यात प्रमुख मान्यवरांची भाषणे होतील व राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारांचे वितरण होईल. दुसरे सत्र हे ‘संवाद सत्र’ असेल जे चार गटात होईल ज्यामध्ये विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील समस्या, एकूणच सामाजिक न्याय, -समतेचे विषय, शासकीय योजना, अन्याय अत्याचाराच्या घटना या विषयी चर्चा, संवाद असेल तिसरे सत्र हे समारोप सत्र असेल ज्यात काही मनोगते होतील, दोन ठराव पारित केले जातील.

सामाजिक न्याय परिषद स्वागत समिती केलेली असून या स्वागत समितीचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.भैय्यासाहेब बिघाने असून श्री.संदीप जाधव, श्री.संजय पाटील, श्री.वासुदेव सोनेकर, श्री.प्रथमेश पुलेकर, श्री.निधी तेलगोटे, प्रा. विजय राठोड या समितीमध्ये आहेत. या सामाजिक न्याय परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुनील कीटकरू, मनीष मेश्राम, अतुल शेंडे, राजू साळवे, भाग्यश्री दिवान, सुधाकर इंगळे, श्रेयश रंगारी, सतीश शिरस्वान, दत्ता शिर्के प्रयत्नशील आहेत.

परिषद दि. – २९ जून २०२५ (रविवार), वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत

स्थळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेन्शन सेंटर, टेका नाका, न्यू इंदोरा, नागपूर.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सामाजिक न्याय परिषद
  • नागपूर
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.