
घर घर संविधान उपक्रम शुभारंभ
पिंपरी दि.२५ (प्रतिनिधी)
संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्यातर्फे संविधान सन्मान अभियानांतर्गत घर घर संविधान या उपक्रमाचा आज दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पिंपरीतील वाल्मिकी आश्रमात शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाला खा. बृज लालजी (माजी पोलीस महासंचालक उ. प्र., माजी अध्यक्ष अनु.जाती व जमाती आयोग उ. प्र.) तसेच महाराष्ट्र राज्य अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान जागर समितीने केले आहे.