
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय पुजारी, सुधीर जोशी ( वंदुरकर), सुनिल वांकर, प्रा. किशोर गायकवाड, सुरेश वाळवेकर, सुनिल आडवी, बसवराज सज्जन, प्रशांत मालंदकर, संतोष अतिग्रे, सचिन खाडे उपस्थित होते..
सुधीर जोशी आणि सुनील वांकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा सांगितला. हिंदुपदपातशाह अशी बिरुदावली शाहू महाराज लावत असत. महाराजांनी हिंदू धर्म सुधारणा केल्या, काळाच्या दोन पावले पुढचा विचार महाराज करीत असत. त्यांच्या कार्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती शक्य झाली आहे, असेही त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी शाहू रचना तयार करून सवाद्य घोष वाजवून अभिवादन केले होते. ती हि आठवण उपस्थितांनी करून दिली. यावेळी शाहूप्रेमी नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.