ज्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो त्यांना विचारलं ,"जगाने तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवावे?" यावर त्यांचे उत्तर 'शिक्षक' असे होते.
कोण होते ते? ते होते अर्थातच भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम.
ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाला अत्युच्च स्थान असते त्यांनाच शिक्षक असे म्हणतात. ज्ञान आपल्याला कुठून मिळते? एक तर ते मिळते मोठ्या तपस्वी लोकांच्या मार्गदर्शनाने किंवा पुस्तकांच्या माध्यमातून. ज्ञानरुपी अमृत पुस्तके आपल्याला देतात. लोकांच्या अंतःकरणात चांगले विचार रुजवून समाजव्यवस्था स्थिर करण्याचं काम ही पुस्तकेच करतात. समाज घडावा असं वाटत असेल तर आधी विचारांमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. चांगले विचार आपल्याला कुठून मिळतात तर ते फक्त आणि फक्त पुस्तकांच्या वाचनातूनच.
आपल्याला कदाचित असेही वाटेल की वाचून असं काय होतं? फक्त वाचण्याने माणूस कसा काय बदलून जाऊ शकतो? मी शाळेत असतानाचा माझा आदित्य नावाचा एक मित्र. लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत. त्याने त्यावेळेला 'मन मे है विश्वास' हे I.P.S. अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या संघर्षाचे वर्णन करणारे पुस्तक वाचले आणि त्याचे आयुष्याचं बदलून गेले. प्रेरणा कशी घ्यावी आणि आपल्या ध्येयाकरता किती समर्पित व्हावे याचे उदाहरणच माझा हा मित्र आहे. याच वर्षी राष्ट्रीय रक्षा अकादमी म्हणजेच N.D.A. मध्ये आदित्यची निवड झाली. NDA च्या मुलाखतीत आदित्यला त्याच्या मित्रांविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने तिथल्या मुलाखकारांना माझ्याविषयी सांगितलं आणि आज मी त्याच्याविषयी लिहितोय. माझी प्रधानमंत्री युवा योजनेमध्ये निवड होऊन माझे पुस्तक राष्ट्रीय पुस्तक न्यासद्वारा प्रकाशीत झालेले कळल्यावर आदित्य हा माझे अभिनंदन करणारा माझा पहिला मित्र होता. आज त्याची NDA मधली निवड अथवा माझी प्रधानमंत्री युवा योजनेतील निवड ही कशामुळे झाली? तर ती वाचनाच्या सवयीमुळे. हे वाचनाचे महत्त्व आहे.
मला तर असं वाटतं पुस्तक वाचनाची एक चळवळच सुरू व्हायला हवी. भारताचे द्वितीय पंतप्रधान शास्त्रीजी यांनी सोमवारी संध्याकाळी उपवास करावा असे आवाहन केले होते. अगदी तसेच आठवड्यातून एकदा पुस्तक वाचण्याचे आवाहन केले पाहीजे. तेंव्हा दुष्काळ पडला होता, पण आज वाचन संस्कृतीचा दुष्काळ पडला आहे. हा दुष्काळ दूर करायचा असेल तर 'वाचन' ही एक राष्ट्रीय चळवळ झाली पाहिजे असं मला वाटतं.
वाचनाचं इतकं महत्व आहे तर मग का वाचन संस्कृती मागे पडत आहे? याचे उत्तर आहे सगळ्यांच्या हतातला भस्मासुर. हो तोच! शुद्ध मराठीत त्याला MOBILE असे म्हणतात. त्या मोबाईल चा त्याग करून जेव्हा आपल्या हातात पुस्तके येतील तेव्हा भारत विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही. विश्वाला ज्ञान देण्याची इच्छा असेल तर आधी स्वतः ज्ञान प्राप्त केले पाहिजे.
शेवटी पंतप्रधानानांच्या शब्दात हेच म्हणेन - When the citizens reads, the country leads.
======
लेखक: ध्रुव पटवर्धन
Dhruv......Congratulations for your speach and reading 'writing books in so early time.
You are defined very well no of subject in short speech which requires today .
Again Congratulations for more writing and reading in your life ahead.
All the best ...Dhurv.
Amol Dhondiram pawar
15 Oct 2023 22:01
दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावें!
नेहमीप्रमाणेचं सुंदर लिहिलं आहेस.बाकी,दोघांनाही पुढील प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा!
Dr.Bhumija Pathak
15 Oct 2023 16:52
ध्रुव, खूप छान व मनातलेच लिहिलंस।शाळेत मुलांना सांगते मी की वाचन करा भरपूर ,दहावीच्या संस्कृत पुस्तकात"वाचन प्रशंसा"हा पाठ आहे,त्यावेळीही सांगितले कारण माझा मुलगा पण वाचनप्रिय आहे। माझेच पुरेसा वेळ नसल्यामुळे वाचन होत नाहीध्रुव तू लिहीत जा।आदित्यचे व तुझे अभिनंदन।अभिमान वाटतो तुम्हा मुलांचा। छान, तुलाबापुढील लिखाणासाठी शुभेच्छा।
सीमा विक्रांत जोशी
15 Oct 2023 14:06