शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वर्षभरातील उत्सवांमध्ये विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी 1925 मध्ये संघाची पहिली शाखा नागपूरच्या मोहिते वाड्यात लागली होती. नागपूरात होणाऱ्या यंदाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमूख पाहुणे म्हणून इस्त्रोचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहे.
नागपूरच्या रेशीमबाग मैदानात शनिवारी (ता.12) सकाळी 7 वाजून 40 मिनीटांनी श्री विजयादशमी उत्सव साजरा केला जाईल. यावेळी पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहे. संघाचे केंद्रीय कार्यालय म्हणून नागपूरात असून, विजयादशमी कार्यक्रमाला येणारे प्रमूख पाहुणे आणि संरसंघचालकांचे उद्बोधन संघाची तसेच देशाची सामाजिक दिशा स्पष्ट करते.
विजयादशमीच्या उत्सवाला या आधी शंकर महादेवन, श्रीमती संतोष यादव, नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी, बाबा निर्मलदास आदींनी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती. संघाच्या विविध कार्यक्रमात वेगवेगळ्या विचारधारांचे प्रसंगी विरोधी विचारधारेच्या पाहुण्यांनीही हजेरी लावली होती.
---
संघाचे प्रमूख सहा उत्सव ः
विजयादशमी, वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), मकर संक्रांती, हिंदू साम्राज्य दिवस, गुरु पोर्णिमा आणि रक्षा बंधन
---
डॉ. के. राधाकृष्णन: इस्त्रोचे माजी अध्यक्ष
डॉ. के. राधाकृष्णन हे भारतातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संस्था (ISRO)चे माजी अध्यक्ष आहेत.
डॉ. राधाकृष्णन 2009 ते 2014 या काळात इस्रोचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे अंतराळ कार्यक्रम उंचावर गेले आणि देशाला अंतराळ क्षेत्रात एक नवे ओळख मिळाली.
- डॉ. राधाकृष्णन यांचे योगदान
1) विक्रम साराभाई स्पेस सेंटर: डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे केली. तेथे त्यांनी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
2) इस्रोचे अध्यक्ष: डॉ. जी माधवन नायर यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी इस्रोचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-1 मोहीम, मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) आणि उपग्रहांच्या जीसॅट मालिकेचे यशस्वी प्रक्षेपण केले.
3) स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन: डॉ. राधाकृष्णन यांचे पहिले प्राधान्य जीएसएलव्हीसाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन विकसित करणे हे होते.
4) अंतराळ कार्यक्रमातील विविध क्षेत्र: डॉ. राधाकृष्णन यांनी उपग्रह संचार, रिमोट सेन्सिंग आणि अवकाश विज्ञान यांसारख्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
- पुरस्कार: डॉ. राधाकृष्णन यांना 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्व आणि वैज्ञानिक योगदानासाठी त्यांना इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.