पुणे -पुण्यात नुकतीच राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व संप्रदायांच्या महंतांसोबत परमपूज्य सद्गुरु आचार्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी या बैठकीत धर्म चिंतन केले. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते यावेळी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. समाजजागृती आणि संविधानिक मुल्यांचा जागर यात करण्यात आला आहे. हिंदू धर्मातील जवळपास सर्वच संप्रदायांचे प्रतिनीधी यात सहभागी झाले होते. वक्फचा विळखा आणि लोकसभेत झालेले एकगठ्ठा मतदान बघता या दोन पुस्तिका समाजात सकारात्मक परिणाम आणू शकतील, असा सूर या धर्म चिंतन बैठकीतून उमटला आहे. केंद्र सरकारचा वक्फ सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर पुस्तक माहितीपूर्ण ठरेल.
फोटो ओळ ः
वक्फ बोर्ड आणि एकगठ्ठा मतदानाचा धडा या दोन पुस्तिकांचे विमोचन करताना स्वामी गोविंद देवगिरी महाराज व अन्य संत.