•  25 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पाड्यावर मुक्काम करत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आदिवासींचे जीवन

विश्व संवाद केंद्र - पुणे 2 days ago
बातम्या  

नाशिक ः प्रेक्षणिय ठिकाणी फार तर एखाद्या ऐतिहासीक किल्ल्यावर विद्यार्थ्यांची सहल जाते. मात्र आदिवासी पाड्यावर जाऊन, त्यांच्याच घरी मुक्काम करत स्थानिक जीवन जगण्याचा अनुभव फार कमी विद्यार्थ्यांना मिळतो. सेवांकुर भारत या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील १३ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हा अनोखा अनुभव घेतला आहे. जवळपास १३० विद्यार्थ्यांनी नुकतेच नाशिक जिल्ह्यातील गुही येथे तीन दिवसीय शिबिरात भाग घेतला असून, स्थानिक नागरिकांची वैद्यकीय मदतही केली आहे. 

सेवांकुर भारत या संस्थेकडून थ्री डेज फॉर नेशन २०२४ हा उपक्रम नाशिक व पुणे विभागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसह २० कंसल्टंट, १६ अधीकारी असे एकूण १६६ लोक सहभागी झाले होते. नाशिकहून निघताना सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूलचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे आणि श्रीगुरूजी रूग्णालयाचे सहकार्यवाह डॉ. गिरीश चाकूरकर आणि कार्यकारी अधिकारी मकरंद धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रवासाची सुरूवात करण्यात आली होती. गुही येथे पोचल्यावर पारंपारिक पावरी वाद्य आणि नृत्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटन सत्राला जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, ज्येष्ठ संघ प्रचारक गिरीश कुबेर यांनी मार्गदर्शन केले. 
---
पाड्यावर मुक्काम....
वनवासी कल्याण आश्रमाच्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गावित, पोस्ट बेसिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक परशुराम गावित यांनी पाड्यावरील निवास व्यवस्था व वैद्यकीय शिबीराचे नियोजन केले. प्रत्येक पाड्यासाठी एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची रचना करण्यात आली. प्रत्येक घरी दोन ते तीन विद्यार्थी मुक्कामाला होते. विद्यार्थ्यांनी स्थानिकांशी संवाद साधला तर काही ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ज्यात विविध वैद्यकीय विषयांबद्दल जनजागृती करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक यजमानांकडे भोजनाचा अस्वाद घेतला. 
---


वैद्यकीय शिबिर ः 
दुसऱ्या दिवसापासूनच गावात वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. एकूण पाच पाड्यांवर आदिवासी बांधवांची रूग्ण तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये रक्तदाबापासून विविध आजारांची तपासणी झाली. एकूण एक हजार ३०८ रूग्णांची तपासणी झाली. त्यातून ८७ रूग्णआंना उपचारासाठी नाशिकच्या श्रीगुरूजी रुग्णालयात जाण्याचे सांगण्यात आले. आवश्यंक रुग्णांना औषधे देण्यात आली. 
---


विविध उपक्रमांची मेजवाणी ः  
डॉ. मधुकर आचार्य यांची खुमासदार मुलाखत डॉ. सुशील बागुल व नम्रता पवार यांनी घेतली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सेवांकुरच्या विद्यार्थांना भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी विशेष ध्यानाचे सत्र डॉ. यश वेलणकर यांनी घेतले. एकत्रीत परीचयाचा समारोपाचे प्रमुख वक्ते संजय कुलकर्णी यांच्या बरोबर झाला. समारोप सत्राला सेवांकूर कोअर टिमचे उपक्रम प्रमुख डॉ. प्रशांत गायकवाड उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांनी वनवासींच्या सम्रुद्ध परंपरा व वनवासी क्रांतिकारक यांचा परीचय करुन दिला. आदिवासी बांधवांचे आशिर्वाद आणि भारावलेल्या मनाने सर्वांनी निरोप घेतला. 
----------------


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • आदिवासी
  • वनवासी
  • सेवांकुर
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (36), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.