“१२ जानेवारी” हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन भारतात “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जग ‘२०२५’ मध्ये स्वामींची १६२ वी जयंती साजरी करणार आहेत. २१ व्या शतकातदेखील मानवी समाजाला विवेकानंदांची जयंती साजरी का करावीशी वाटते? हा अतिशय जाणिवेचा प्रश्न आहेत. सदर प्रश्नाच्या उत्तराचा यथा-योग्य शोध घेण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांनी समाज, संस्कृती, धर्म, स्त्री, दलित व युवक, व इतर समाजातील विविध घटकांच्या बाबतीत नेमकी कोणत्या स्वरूपाचे चिंतन केलेले आहेत व त्यांची वेळेनुसार प्रसंगीकता काय आहेत, यांविषयीचा शोध घेणे गरजेचे आहेत.
सदर लेखात स्वामी विवेकानंद यांनी “भारतीय आधुनिक समाजाबाबत” कशी व कोणत्या प्रकारची धारणा केलेली आहेत. तसेच, त्यांना कोणत्या स्वरूपाचा आधुनिक भारतीय समाज अपेक्षित आहेत, याबाबतचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहेत.
- प्रा. डॉ. रोहित अशोक मुळे
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा कालावधी (१९६३-१९०४) जर लक्षात घेतला तर आपसूकपणे ध्यानात येते की, तेव्हा “आधुनिक युगाची (Modern Age)” सुरूवात झालेली होती. जरी, ते “भारतीय वैदीक व उपनिषद” तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असले तरी त्यांच्या विचारांवर ह्या आधुनिक युगातील वैचारिक तत्वज्ञानाचा मोठ्या प्रभाव झालेला दिसून येतो. याचाच अर्थ असा की, विवेकानंद यांच्या वैचारिक जडणघडणीत “भारतीय तत्वज्ञान व पश्चिमात्य आधुनिक तत्वज्ञान” यांचा संयोग आढळतो. या वैचारिक समिश्रणाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञानाचा मार्ग सांगितला तर पश्चिमात्य समाजाला भारतीय परंपरेचे सूत्र असलेले “वेद व उपनिषदे” यांचे उदात्त तत्वज्ञान सांगितले. स्वामीजी त्यांच्या विचारांतून प्रमुख्याने “भौतिक विज्ञान व आध्यात्मवाद” यांची उचित सांगड घालून जागतिक समाजाला “समतोल (Balance)” असा प्रगतीचा मार्ग दाखवायचा होता.
स्वामी विवेकानंदांची वैचारिक जडण-घडण
विवेकानंद यांचा जन्म जानेवारी १२, १८६३ रोजी कलकत्ता (प. बंगाल) येथील प्रसिद्ध, विद्वान व निष्णात वकील विश्वनाथ (बाबू) दत्त व भुवनेश्वरी (माता) यांच्या घरात झाला. पाळण्यातील नाव “नरेंद्र”, प्रेमाच नाव “बिले”, रामकृष्ण परमहंस यांची दीक्षा घेतल्यावर “विविधीशानंद”, संबध जगाचा प्रवास करीत असताना व शिकागोच्या सर्वधर्मपरिषदे (१८९३) नंतर संपूर्ण जगाला “विवेकानंद” नावाने परिचित झालेले असा एकूण ३९ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी विविध नावे स्वीकारलेली होती. हा नावांचा प्रवास म्हणजे त्यांच्या वैचारिक व्यक्तिमत्वात झालेल्या प्रगल्भ स्थित्यंतरचे प्रगट असे उदाहरण होते. स्वामींचा जीवन आलेखवर नजर टाकली तर लक्षात येते की त्यांच्या मूळ स्वभावतच बदल (transformation) व आव्हान (challenge) स्वीकारण्याची क्षमता होती. मग ते सांस्कृतिक असो किंवा धार्मिक असो. त्यामुळेच त्यांचे जीवन वैचारिक पातळीवर सतत बदलत गेले, त्याचबरोबर प्रगल्भ देखील होत गेले.
लहानपणीचा नरेंद्र हा अतिशय ‘खोडकर आणि व्रात्य’ असा मुलगा परंतु तितकाच संवेदनशील व चिकित्सक वृत्तीचा देखील होता. त्यामुळेच एखादी घटना घडली तर त्याबाबत का? कशी? केव्हा? कोठे? यांबाबत विविध प्रश्न तयारच असायची. त्याच्या ह्या असल्या स्वभावामुळेच बालपणी सहवासात असणाऱ्यापैकी क्वचितच लोकांना याची जाणीव झालेली असेल, की भावी काळात हाच नरेंद्र (बिले) जगाला भारतीय वैदिक तत्वज्ञाणाची उदारता व महत्ता यांचा यशस्वीपणे परिचय करून देणारा “स्वामी विवेकानंद” होईल. नरेंद्रला नेहमीच घरी किंवा शाळेत असताना विविध पद्धतीचे विचित्र असे प्रश्न पडत होते. त्याच्या चिकित्सक वृत्तीमुळे नवनवीन गोष्टी समजून घेण्यात सतत वाव मिळत गेला. कधी-कधी तर त्याच्या क्लिष्ट अश्या प्रश्नामुळे शाळेतील शिक्षक किंवा घरातील वडील मंडळी देखील वैतागून जात असत. या संदर्भात दोन प्रसिद्ध उदाहरण आहेत. पहिले, लहानपणी घरासमोरील असणाऱ्या झाडावर नरेंद्र व मित्र-मंडळी नेहमीच खेळत असत. त्यांच्या खेळण्याचा झाड मालकाला प्रचंड त्रास होत असायचा. म्हणून झाड मालकाने त्यांना संगळ्याना भीती दाखवण्यासाठी संगितले की त्या झाडावर खेळत नका जाऊ कारण तिथे “ब्रह्म-राक्षस” राहतो. तो तुम्हाला पाताळात पकडून घेऊन जाईल. तेव्हा, त्या रात्री नरेंद्र रात्रभर त्या झाडावर त्या ब्रह्म-राक्षसाची वाट पाहत राहीला परंतु तिथे ब्रह्म-राक्षस काही आला नाही. तेव्हा रात्रभर नरेंद्रची शोधाशोध देखील झाली. दुसऱ्या दिवसी सगळ प्रकरण उघडकीस आल तेव्हा कळल नरेंद्र रात्रभर ब्रह्म-राक्षसाची वाट पाहत पाहत बसला होता. दुसरे, माता भुवनेश्वरी खूप देव-धार्मिक होती. नरेंद्र ने मातेला प्रश्न केला की “माते देव कुठ असतो व कधी भेटतो”. तेव्हा मातेने सहज लहान पोरची समजूत म्हणून उत्तर दिले की त्याचे ध्यान केल्यावर तो भेटतो. त्या रात्री नरेंद्र पूर्णपणे ध्यानात गेला आणि खरोखर देव भेटतो का याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आपल्या मातेला सांगितले की “माते मी रात्रभर ध्यान केले पण देव मात्र भेटला नाही”.
ह्या दोन वर्णन केलेल्या घटनेतून एक गोष्ट लक्षात येते की नरेंद्र लहानपणापासूनच बुद्धीने अतिशय चाणाक्ष व चिकित्सक दृष्टिकोनाचा होता. याचा अर्थ असा की थोरा-मोठ्याने काही संगितले म्हणून त्यावर चटकन विश्वास ठेवणाऱ्यापैकी नरेंद्र अजिबात नव्हता. एखादी बाब कोणी सांगितली तर त्याबाबत शोध घेण्याची त्यांची वृत्ती नेहमीच असायची. मग ती बाब “देवाच्या अस्तित्वा” संबंधित जरी असेल तरी सुद्धा. पुढे या “चिकित्सक दृष्टिकोणाचा” उपयोग नरेंद्रला त्याच्या महाविद्यालयीन जीवनात मोठ्या प्रमाणात झाला होता. कारण, विश्वनाथ बाबू अकाली गेल्यामुळे नरेंद्रच्या घरावर गरिबीची परिस्थिति ओढवली. तरुणवयात त्यांना समाजातील दुख व गरीबी दिसत गेली. मग ह्या भारतीय समाजाच्या दैन्य-अवस्थेची मूळ कारणे शोधण्याच्या हेतून नरेंद्रने “सामाजिक-विज्ञान-शास्त्राचा” अभ्यास करण्यास सुरवात केली. तेव्हा त्याने भारतीय व पश्चिमात्य तत्वज्ञानाचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला. त्यात, भारतीय तत्वज्ञानातील वेद, उपनिषदे, व्याकरण, इतर संबधित साहित्य वाचून काढले. तसेच, पश्चिमात्य तत्वज्ञानातील एरिस्टॉटल पासून ते मार्क्स, हेगेल, एंजेल पर्यन्त सर्व विचार त्यांनी समजून घेतले.
या सर्वांगीण तात्विक बाबींच्या अभ्यासाचा परिणाम नरेंद्रची बुद्धीची व विचारांची स्वतंत्रता प्रस्थापणा (बैठक) करण्यात झाला. तरुणवयातच वडीलांची साथ सुटल्यामुळे जीवनात जे जे प्रसंग ओढवले त्यांची सांगड वाचलेल्या तत्वज्ञानाशी घालून त्यांचा अर्थ अधिक प्रकर्षाने त्यांना जाणवू लागला. त्यामुळेच नरेंद्रला भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या प्रमुख सामाजिक, सांस्कृतिक, व आर्थिक प्रश्नांची उकल व्यवस्थित करण्यात आली. नुसते भारतीय समाजातील प्रश्नांची उकल विवेकानंद यांनी तरुण वयात केली नाही, तर त्यांची समज ही त्या पलीकडे पश्चिमात्य समाजातील प्रश्नांची उचित उकल करण्यापर्यंत देखील पोहचली होती. त्यामुळेच विवेकानंद यांचे विचार काळजी पूर्वक पद्धतीने समजून घेतले तर लक्षात येते की त्यांच्या विचारांचे वैशिष्ट म्हणजे “आधुनिक पश्चिमात्य व पारंपरिक भारतीय” विचारांची यथा-योग्य सांगड होय. त्यातून त्यांनी पश्चिमात्य समाजाला देखील नेमकेपणाने मार्गदर्शन केल्याचे दिसून येते.
जेव्हा, नरेंद्र तरुण वयात दक्षिणेश्वरीच्या कालीच्या मंदिरातील रामकृष्ण परमहंस या कालीच्या उपासकाच्या सहवासात आला. तेव्हा त्याच्या जिज्ञासू वृत्तीला उचित वाव व दिशा मिळाली. स्वामीजीना रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात खऱ्या अर्थाने भारतीय तत्वज्ञानाचा मूळ मतितार्थ उमगला. आणि, आपले जीवन भारतीयच नव्हे तर जगाच्या कल्याणाकरिता उपयोगी आणायचे याची अनुभूति झाली. तेव्हा पासून विविधीशांनंद जगाच्या भ्रमंतीसाठी बाहेर पडले ते भारतीय तत्वज्ञानाची ओळख इतराना करून देण्यासाठी व जगात जे-जे चांगले आहेत ते भारताच्या कल्याणासाठी स्वीकारून स्व-देशात आणण्यासाठी.
परंतु, मुख्य मुद्दा असा की लहानपणी, स्वामींच्या वैचारिक जडणघडणीत आधुनिक पश्चिमात्य व पारंपरिक भारतीय तत्वज्ञान यांचा सुंदर संयोग दिसतो. त्यामुळे स्वामींचे व्यक्तिमत्त्व ही प्रगल्भ दिसून येते. त्यांच्या तत्वात असणारी ‘समग्रता’ ही प्रामुख्याने त्यांच्या स्वीकार्य बुद्धिमत्तेचा परिणाम आहेत. त्यांचे विचार कोणताही व्यक्ति जेव्हा वाचतो मग तो कोणत्या धर्माचा, पंथाचा, लिंगाचा, व जातीचा तेव्हा त्याचा “संकुचितता नव्हे तर समग्रता” दिसून येते. विचारांची “समग्रता” हीच भारतीय वैदिक व उपनिषद तत्वज्ञानाचा प्रमुख आधार आहेत हे त्यांनी आयुष्यभर जगाला सांगितले नव्हे तर तर तत्वज्ञान जगून दाखवले. त्याचमुळे, स्वामी विवेकानंद ह्या व्यक्ति-पुरुषाबाबत जगाच्या पाठीवर आदराचे स्थान असल्याचे जाणवते.
(लेखक हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे पीएच.डी. धारक असून, भारतीय संस्कृती, समाजजीवन आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. )