•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 3 days ago
बातम्या  

पुणे, दि. १७ ऑगस्ट :- विश्व संवाद केंद्र, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. १९ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता  होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, माध्यमांचे अभ्यासक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारक शहजाद पूनावाला यांच्या हस्ते एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी दिली. या प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळपरिषद सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते.

अभय कुलकर्णी  पुढे म्हणाले की, या  पुरस्कार उपक्रमाचे हे १२ वे वर्ष असून देवर्षी नारद  यांच्या नावे हे पुरस्कार दर वर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहील. 

यंदाच्या 'ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार'साठी नगरचे 'दिव्य मराठी'चे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के यांची, तर अन्य तीन पुरस्कारासाठी अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांची निवड झाली आहे. 

यापूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर,  ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर  ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदींना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

हा कार्यक्रम शनिवार दि. १९  ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये होणार आहे.  या वेळी शहजाद पूनावाला यांचे ‘समाजमाध्यम आणि डिजिटल मीडिया युगातील पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे असतील. या समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि  डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या  शिक्षणाच्या संधी आणि  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठ याविषयी माहिती या वेळी डॉ. रवींद्र आचार्य यांनी दिली.

राष्ट्रीय विचारांनी  प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून ३० केंद्र कार्यरत आहेत. पुण्यातील केंद्राची स्थापना २०१४ झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. विश्व संवाद केंद्र राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करते. त्यासाठी केंद्रातर्फे माध्यमांशी माहितीची देवाणघेवाण करून समन्वय ठेवला जातो.  

========

(अधिक माहितीसाठी संपर्क:   8468957320)


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • #नारद
  • #पुरस्कार
  • #देवर्षी
  • #२०२३
  • #विश्व संवाद केंद्र
  • #डेक्कन सोसायटी
  • #पत्रकारिता
  • #Narad
  • #Puraskar
  • #Award
  • #Journalism
  • #Devarshi
  • #VSK
  • #Vishwa Samvad Kendra
  • #Deccan Society
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.